शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयाचा परिसर समस्याग्रस्त

By admin | Updated: June 29, 2017 00:37 IST

धुनिवालेबाबा मंदिर परिसराजवळ असलेल्या खासदार रामदास तडस यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळील न्यू स्टेट बँक कॉलनी

स्टेट बँक कॉलनी : चिखलातून नागरिकांना करावे लागते मार्गक्रमण लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : धुनिवालेबाबा मंदिर परिसराजवळ असलेल्या खासदार रामदास तडस यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळील न्यू स्टेट बँक कॉलनी परिसरात पावसाळ्यात रस्त्याची समस्या बिकट झाली आहे. या परिसरातील नागरिक रस्ता समस्येमुळे त्रस्त झाले असून या भागातील अनेक ठिकाणी खा. तडस यांनी रस्ते काँक्रीटीकरणासाठी निधी दिला. परंतु कंत्राटदार काँक्रीटीकरणाचे काम अतिशय संथ गतीने करीत आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातून पादचाऱ्यांना पायी चालणे ही कठीण झाले आहे. पहिल्याच पावसात वाहने घसरून या भागात अनेकांना अपघात झाला आहे. शाळकरी मुलांना रस्त्याने जाणे कठीण झाले आहे. न्यू स्टेट बँक कॉलनीत नवनागे ले-आऊटच्या मागील भागातील परिसरात ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. या परिसरात न्यू आर्टस् कॉलेजचेही विद्यार्थी राहतात. त्यांना ही महाविद्यालयात जाताना अडचण येत आहे. खासदार रामदास तडस यांनी न्यू स्टेट बँक कॉलनीतील नागरिकांची ही समस्या त्वरित सोडण्यासाठी रस्ता काँक्रिटीकरण्याचे काम त्वरित करावे अशी मागणी अ‍ॅड. देशमुख, डवले केळवतकर, वाघमारे, लाडे, खोडे आदी नागरिकांनी केली आहे. शिवार्पण नगरातील रस्त्यांची दुरवस्था नालवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या तिवारी ले-आऊट शिवार्पण नगर भागातील रस्त्याची पावसाळ्यात प्रचंड दुरवस्था झाली आहे. नालवाडी येथून म्हसाळा गावाला जोडणारा हा रस्ता शिवार्पण नगरातून जातो. या भागात राहणाऱ्या नागरिकांना सध्या चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे. नालवाडी गावाचा हा विस्तारीत भाग असून या भागात अनेक ठिकाणी नाल्या बांधकाम करण्यात आलेले नाही. तसेच रस्त्याचे खडीकरण पूर्णत: उखडून गेले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. या रस्त्यावरून खासगी कंत्राटदारांची जड वाहने मोठ्या संख्येने जात असल्याने पूर्ण रस्ता खराब झाला आहे. खासदार रामदास तडस यांच्या निधीतून या रस्त्याच्या काँक्रीटीकरण/डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर मात्र हे काम अजूनही सुरू झालेले नाही. खासदार तडस यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिवार्पण नगरातील नागरिकांनी केली आहे.