शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
2
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
3
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
4
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
5
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
6
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
7
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
8
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
9
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
10
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
11
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
12
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
13
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
14
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
15
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
16
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
17
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
18
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
19
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
20
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप

प्रबोधनाकरिता जनजागृती रॅली

By admin | Updated: May 19, 2014 23:50 IST

जनजागरण, प्रबोधन रॅली अंतर्गत किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात सभांचे आयोजन करण्यात आले़ यात सेलू तालुक्यातील गायमुख,

वर्धा : जनजागरण, प्रबोधन रॅली अंतर्गत किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात सभांचे आयोजन करण्यात आले़ यात सेलू तालुक्यातील गायमुख, वडगाव (जं.), शिवणगाव, मेनखत, वडगाव (खु.), वडगाव (कला), जुवाडी, धानोली (गावंडे), नानबर्डी, अंतरगाव, जुनगड येथे शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली़ शिवाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या आंदोलनाची माहिती देण्यात आली. ‘बुद्धं शरणम गच्छामी’ हा अद्यावत संदेश तथागत भगवान गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वीच दिला. तो संदेश आज अधिक उपयुक्त असल्याचे आपल्याला जाणवत आहे. समाजात समता विकसित करण्यासाठी स्वतंत्र चिंतनाची गरज आहे. बुद्धीच्या प्रगल्भतेशिवाय ते शक्य नाही़ म्हणून बहुसंख्येचे बुद्धी व विज्ञाननिष्ठ व्यापक समाजमन झाले तरच मानवी मुल्यांची प्रतिष्ठापना होईल, असे मत किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी व्यक्त केले. ज्यांचे प्रश्न कुणीही सोडवत नव्हते, ते प्रश्न सोडविण्याचा व राजकारणाचा काही संबंध नाही, असे म्हणणार्‍या तथाकथित नेतागिरी करणार्‍यांसमोर आव्हान उभारत आहोत. यापूढे केवळ पक्ष, नेता, जात, धर्म, पैसा या सामान्य आमिषाला बळी पडणार्‍या समाजाने लायकी नसणार्‍यांना त्यांची जागा दाखवावी. ज्यांना विचारांची व विकासाची दृष्टी आहे, प्रश्न सोडविण्याची तळमळ आहे, अशा प्रज्ञावंत, बुद्धीनिष्ठ, कार्यनिष्ठ, व्यक्तींनाच लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिसाद दिला पाहिजे़ तरच तुम्ही उज्वल भविष्याची अपेक्षा करू शकता, असेही त्यांनी सांगितले़ जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी संघटीत होऊन प्रश्न सोडविला जाऊ शकतो. यामुळे संघटनेच्या शक्तीला बळ द्या व आपले प्रश्न सोडवा, असे आवाहन केले. वर्धा तालुकाध्यक्ष भाऊराव काकडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सभेला तुकाराम पुसाम, मधुकर धवणे, विजय भांडेकर, माणिक पंधराम, विनोद उरकुडे, श्रीकांत गावंडे, वंदना मून, निर्मला वाघ, संजय मसराम, प्रकाश करनाके, विकास उमाटे, किशोर पाटील, एकनाथ येळणे, मनोहर भांडेकर, अनिल टेकाम, संजय मसराम, अमीत वानखेडे, गोविंद कुमरे, लक्ष्मण ठाकरे, सुरेश नेहारे, मधुकर कुकडे, सिद्धार्थ मानकर, राजेंद्र उडाण, गंगाधर येलोरे, सुनील पिंपरे, सुनीता वैरागडे, कमला उईके, अर्चना चलाख, अरुण वैरागडे आदी उपस्थित होते़(स्थानिक प्रतिनिधी)