शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखुजन्य आजाराबाबत जनजागृती

By admin | Updated: June 21, 2014 01:58 IST

चैतन्य सेवाभावी संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने गिरनाळा (सुकळी) येथे..

वर्धा : चैतन्य सेवाभावी संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने गिरनाळा (सुकळी) येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकारणचे सचिव वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश चंद्रपाल मेश्राम उपस्थित होते. उद्घाटक म्हणून सुकळी(बाई)येथील सरपंच दिलीप खिराळे होते. तसेच प्रमुख अतिथी अ‍ॅड. अनिता ठाकरे, अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ अध्यक्ष प्रकाश वाघ, समाजसेवक बाबाराव अडसड उपस्थित होते.यावेळी बोलताना मेश्राम यांनी भारतीय तंबाखु नियंत्रण कायदे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सिगारेट अधिनियम, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी याची माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानक आणि गाड्यात धुम्रपानास बंदी घातली. केंद्रशासनाने टेलिव्हिजनद्वारे तंबाखुच्या जाहिराती व प्रदर्शनावर बंदी घातली. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकावर गुटखा विक्रीस बंदी घातली. तर २००१-०३ मध्ये तामिळनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, गोवा या राज्यांनी अन्य भेसळ प्रतिबंधक कायद्याद्वारे गुटखा उत्पादन आणि विक्री बंदी केली. तसेच सिगारेट व अन्य तंबाखु उत्पादने अधिनियम २००३ यावर बोलताना सदर कायदा २००३ साली संपूर्ण भारतासाठी लागू करण्यात आला. तसेच या कायद्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या, अशी कायदेविषयक माहिती दिली.यानंतर बोलताना प्रकाश वाघ यांनी तंबाखु, गुटखा या व्यसनावर माहिती देताना ग्रामगितेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मार्गदर्शन केले. जनजागृती करुन व्यसनमुक्त केले. तंबाखुच्या व्यसनावर भजन रचून जागृती केली. तसेच अ‍ॅड. ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना तंबाखु ही जगातील मोठी समस्या आहे. तंबाखुमुळे होत असलेल्या मृतांमध्ये बहुतांश व्यक्ती प्रौढ आणि उत्पादक वयोगटातील असतात, हे राष्ट्रविकासासाठी हानिकारक आहे. तंबाखू विरोधी सप्ताहाच्या माध्यमातून जागृती करण्यात सुरुवात केली. ज्याचा मुख्य उद्देश तंबाखु विरोधी प्रचार करणे आणि तंबाखुमुळे होणाऱ्या मृत्यूची व विविध रोगाची माहिती जनसामान्यांना देणे आवश्यक आहे. यावेळी उपस्थित मंडळींना व्यसनमुक्त होण्याची सामुहिक शपथ घेतली. कार्यक्रमाचे संचालन पाटील यांनी केले तर आभार अ‍ॅड. ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला उपस्थित मंडळीना तंबाखु जागृतीबाबतचे व्यसनमुक्तीकरिता माहिती म्हणून जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्यावतीने गावकरी मंडळींना माहितीपत्रक देण्यात आले.