शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या जीवावर उठलेल्या मॅक्सीकॅबच्या परवानगीला विरोध

By admin | Updated: December 21, 2014 23:03 IST

आतापर्यंत अवैध वाहतूक म्हणून ओळख असलेल्या मॅक्सीकॅबला परवानगी देण्याच्या प्रयत्नात राज्यकर्ते आहेत. या वाहतुकीला परवानगी मिळाल्यास ती एसटीच्या मुळावर उठणारी आहे. यामुळे शासनाच्या

वर्धा : आतापर्यंत अवैध वाहतूक म्हणून ओळख असलेल्या मॅक्सीकॅबला परवानगी देण्याच्या प्रयत्नात राज्यकर्ते आहेत. या वाहतुकीला परवानगी मिळाल्यास ती एसटीच्या मुळावर उठणारी आहे. यामुळे शासनाच्या या प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाही. या परवानगीचा महाराष्ट्र मोटार कामगार फेडरशेनच्यावतीने विरोध करण्याबाबतची चर्चा वर्धेत रविवारी झालेल्या २७ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात करण्यात आली.श्रद्धेय कै. भाऊसाहेब चंद्रायण नगरी (आकरे मंगल कार्यालय) येथे आयोजित या अधिवेशनाला केंद्रीय कामगार शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष लक्ष्मा रेड्डी, खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे, महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष मारोतराव झोटींग, भारतीय परिवहन मजदूर महासंघाचे अध्यक्ष चेतन देसाई, महासंघाचे प्रभारी के.पी. सिंग, महासंघाचे विदर्भ अध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष किसन सैद, मुख्य सचिव आत्माराम सातारकर, सल्लागार गोविंद राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार व आमदारांनी अधिवेशनाबाबत त्यांच्या भूमिका विषद केल्या.या अधिवेशनात फेडरेशनशी संलग्नित सर्वच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यात मॅक्सीकॅबच्या परवानगीचा मुख्य विषय ठरला. या व्यतिरिक्त परिवहन महामंडळ भ्रष्टाचारमुक्त करण्याकरिता काही उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त करण्यात आली. आर्थिक दृष्ट्या मागास होत असलेल्या एसटीला आर्थिक पाठबळ देण्याच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. सोबतच शासनाकडे असलेली थकबाकी त्वरीत महामंडळाला परत करावी, एसटीत मान्यताप्राप्त नसलेल्या संघटनांची होत असलेली मुस्कटदाबी बंद करावी आदी विषयही यावेळी झालेल्या चर्चेत समाविष्ट करण्यात आले होते. भारतीय मजदूर संघ संलग्नित महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे संचालन अरविंद बाभळे यांनी केले. वर्धेत झालेल्या अधिवेशनाच्या आयोजनाकरिता विठ्ठल फाळके, दिलीप पंचभाई, रवी सातपुते, विलास वरघणे, प्रमोद बमनोटे, चरणदास धाणके, गजानन देवढे यांच्यासह फेडरेशनच्या इतर सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)