शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता व पाणीपट्टी करापोटी थकले १.०८ कोटी

By admin | Updated: March 19, 2017 01:01 IST

शहरात अंदाजे ३ हजार ५०० मालमत्ताधारक व २ हजार ३०० नागरिकांकडे शासकीय नळजोडण्या आहेत.

थकबाकीदारांवर नगरपंचायत उगारणार वसुलीचा बडगा कारंजा (घा.) : शहरात अंदाजे ३ हजार ५०० मालमत्ताधारक व २ हजार ३०० नागरिकांकडे शासकीय नळजोडण्या आहेत. या नागरिकांकडे गत वर्षाची एकत्रीत कर थकबाकी १५ लाख रुपये आहे. तर यावर्षीच्या मालमत्ता कराची मागणी ६८ लाख ६८ हजार ८१२ तर पानीपट्टी कराची मागणी २४ लाख ६५ हजार ९०५ रुपये असे एकूण १ कोटी ८ लाख रुपये थकले आहेत. या थकबाकीकरिता नगरपंचायतीच्यावतीने विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून आतापर्यंत २५ लाख ६५ हजार रुपयांच्या मालमत्ता कराची व १६ लाख ५५ हजार रुपयांच्या पाणीपट्टी कराची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. या वसुलीनंतरही ६८ लाख रुपयांची कर वसुली नागरिकांकडे थकली आहे. शहराच्या विकासासाठी फंड उपलब्ध करण्याच्या हेतूने कारंजा नगरपंचायततर्फे शासनाच्या आदेशानुसार थकीत कर वसुल करण्याच्या हेतूने विशेष मोहीम राबविणे सुरू आहे. आतापर्यंत अनेक सूचना देवूनही थकबाकीदारांनी कर भरला नसल्याने विशेष पथक नेमण्यात आले आहे. वसुलीसंदर्भात कडक धोरण स्वीकारून थकीत कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त करून लिलाव सुध्दा करण्यात येईल अशी माहिती कारंजा नगर पंचायत मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी दिली आहे. थकबाकी वसुली मोहिमेची सुरुवात मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायतच्या मालकी हक्काच्या गाळ्यांपासून केली. यात थकबाकी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार गाळेमालकांच्या दुकानांन कुलूप ठोकण्यात आले आहे. वारंवार सुचना देवून पाणी कर न भरणाऱ्यांचे नळ बंद करण्यात आले आहे. यावरही नागरिकांकडून विशेष सहाकार्य मिळत नसल्याने शेवटी नगरपंचायतने नगरपरिषद कायदा १९६५ च्या कलम १५२ नुसार थकीत वसुलीसाठी अधीसूचना काढण्याचा निर्णय घेतला आहे. या अधीसूचनेनुसार प्रथम कर थकबाकीदारांची मालमत्ता नियमानुसार जप्त केली जाईल. त्यानंतर ही रक्कम न भरल्यास मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल. लिलावात कोणी भाग न घेतल्यास ती मालमत्ता नाममात्र दरात नगरपंचायत स्वत:च्या नावे करणार असल्याची माहिती नगरपंचायतीच्यावतीने देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी) नागिरकांकडून कराचा भरणा होत नसल्याने नगर पंचायतीची तिजोरी खाली आहे. यामुळे शहरात विकास कामे करणे अवघड झाले आहे. तिजोरी खाली असल्याने अनेक कामांचा खोळबा झाला आहे. याचा विचार नागरिकांनीच करणे गरजेचे आहे. त्याच्याकडून कर आल्यास निधी उभा होईल आणि कामे होतील असे मुख्याधिकारी राऊत म्हणाल्या.