शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाच्या कालव्यांचे अस्तरीकरण होणार

By admin | Updated: December 23, 2014 23:10 IST

पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता कालव्यांना अस्तरीकरण करण्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनस्तरावरुन संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे.

शासनस्तरावर दखल : संबंधित यंत्रणेला आदेशहिंगणघाट : पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता कालव्यांना अस्तरीकरण करण्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनस्तरावरुन संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. लोअरवणा प्रकल्प २५ वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आला. १९९२-९३ पासून या प्रकल्पातील पाण्याने शेतात सिंचन केले जात आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यांना तसेच नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील शेतांना या प्रकल्पातील पाणी सिंचनाकरिता उपलब्ध होते. परंतु डाव्या कालव्याला अस्तरीकरण नसल्याने साधारणत: ६० टक्के पाणी वाया जात असल्याने सिंचन क्षेत्र घट निर्माण झाली आहे.याचा सिंचनावर विपरित परिणाम होवू नये म्हणून मिहानच्या वतीने २००७-०८ मध्ये कालव्याच्या अस्तरीकरणाकरिता सुमारे ३६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता, परंतु तत्कालीन शासनाने हा निधी कालव्याच्या अस्तरीकरणाकरिता न वापरता इतरत्र वळविल्याची तक्रार नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.विशेष म्हणजे याच प्रकल्पाच्या वडगाव धरणातून नागपूर येथे मिहान प्रकल्पाला सुद्धा पाणी दिल्या जाते. अस्तरीकरण न झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. अस्तरीकरण केल्यास पाण्याचा अपव्यय थांबून शिवारातील शेतीला सिंचन होऊ शकते. तसेच अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. सध्या पाण्याच्या एका आवर्तनाला एक महिना लागतो. तो कालावधी पाण्याची बचत झाल्याने पंधरवाड्यावर येईल. तसेच सध्या होत असलेली सिंचनाची तीन ते चार अवर्तने वाढून ती पाच-सहा होतील, याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनाची दखल घेत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहे. कालव्यांचे अस्तरीकरण होणार असल्याने पाण्याचा होणारा अपव्यय थांबणार असून सिंचनाला फायदा होणार आहे. मात्र याची अंमलबजावणी केव्हा होणार याकडे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)