शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचन योजनेने वाढविली अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:13 IST

आर्वी तालुक्यातील ४९ गावातील ८४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी आर्वी उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; पण मालतपूर शेतशिवारात शेतातच मेन लाईनपासून पाणी वाहून नेणारे पाईप टाकण्यात आल्याने व त्याकडे युद्धपातळीवर काम पूर्णत्त्वास नेण्याची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळवाहीच्या कामांनाच ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराची मनमर्जी : उन्हाळवाहीच्या कामाला लागला ‘ब्रेक’

फनिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : आर्वी तालुक्यातील ४९ गावातील ८४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी आर्वी उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; पण मालतपूर शेतशिवारात शेतातच मेन लाईनपासून पाणी वाहून नेणारे पाईप टाकण्यात आल्याने व त्याकडे युद्धपातळीवर काम पूर्णत्त्वास नेण्याची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळवाहीच्या कामांनाच ब्रेक लागला आहे.सिंचनाची भरीव सोय व्हावी म्हणून शासनाने आर्वी उपसा सिंचन योजना लोअर वर्धा प्र्रकल्पाच्या बॅक वाटर वर सुरू केली आहे. सुरूवातीच्या आराखड्यानुसार या योजनेवर २५० कोटी पेक्षा अधिक खर्च होणार आहे. मागील वर्षी सर्व्हेचे काम पूर्ण करण्यात आले. तर यावर्षी वॉटर टँक आणि जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प नियोजीत वेळेत पूर्ण झाल्यास खर्चाचे बजेट वाढणार नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष कामाला युद्धपातळीवर सुरूवात करण्यात आली; पण सध्या कामाचा वेग मंदावला आहे. शिवाय मलातपूर शेतशिवारात अनेकांच्या शेतात कंत्राटदाराने मोठाले पाईप टाकून ठेवले आहे. हे पाईप खोलवर खड्डा करून त्यात वेळीच पुरविणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कंत्राटदाराने तातडीने सदर पाईप जमिनीत पुरवावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांची आहे.सदर योजनेचे काम झटपट पूर्णत्वास गेल्यास याचा फायदा शेतकºयांनाच होणार आहे. हे जरी खरे असले तरी मागील काही दिवसांपासून शेतात मोठमोठे पाईप पडून आहेत. त्यामुळे उन्हाळवाहीची कामे कशी करावी, असा प्रश्न भेडसावत आहे.- नरेश वानरे, शेतकरी, मलातपूर.