शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मुद्रा लोनची खासगी बँकांना ‘अ‍ॅलर्जी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:21 IST

बेरोजगार युवकांना रोजगार उभारता यावा, उद्योजगांना त्यांच्या व्यवसायाला बळ देता यावे तथा युवकांनी नोकरीच्या मागे लागू नये म्हणून पंतप्रधान मुद्रा लोन योजना सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देबेरोजगार त्रस्त : अधिकाऱ्यांचेही हात वर

आॅनलाईन लोकमतवर्धा : बेरोजगार युवकांना रोजगार उभारता यावा, उद्योजगांना त्यांच्या व्यवसायाला बळ देता यावे तथा युवकांनी नोकरीच्या मागे लागू नये म्हणून पंतप्रधान मुद्रा लोन योजना सुरू करण्यात आली. पण या योजनेतून कर्जच मिळत नसल्याने बेरोजगार युवकांची गोची होत असल्याचे चित्र आहे. किमान राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रक्रिया तरी केली जाते; पण खासगी बँकांना तर मुद्रा लोन योजनेची ‘अ‍ॅलर्जी’ असल्याचेच चित्र जिल्ह्यात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान मुद्रा लोन योजना राबविण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले. वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत तथा खासगी बँकांना तत्सम निर्देश जिल्हा अग्रणी बँकेमार्फत दिले गेले. असे असले तरी केवळ राष्ट्रीयीकृत बँकांतूनच मुद्रा लोनची प्रकरणे पारित केली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. काही राष्ट्रीयीकृत बँकाही युवकांना चकरा मारण्यास बाध्य करीत असल्याच्या तक्रारी आहेत. आर्वी नाका, गजानननगर परिसरातील काही युवक-युवतींनी मुद्रा लोन मिळावे म्हणून अर्ज केले होते; पण तब्बल दोन महिने त्या युवकांना कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना देत टोलविले गेल्याचे वास्तव आहे. या युवक-युवतींनी राष्ट्रीयीकृत बँकेत प्रकरणे दाखल केली होती, हे विशेष!खासगी बँकांमध्ये तर बेरोजगार युवक-युवतींना मुद्रा कर्ज योजनेची व्यवस्थित माहितीही दिली जात नसल्याची ओरड होत आहे. याबाबत अनेक गरजू युवक जिल्हा अग्रणी बँकेकडे तक्रारी करतात; पण यावर कार्यवाही होताना दिसत नाही.मुद्रा लोन योजनेचे तीन भाग करण्यात आले आहेत. बँकांचा सर्वाधिक भर शिशू मुद्रा लोनवरच असल्याचे दिसून येते. गरजू युवक, युवतींना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. तरूण गटातील पाच लाख व प्रौढ गटातील दहा लाख रुपयांचे कर्ज मोजक्याच उद्योजकांना दिले जात असल्याचे वास्तव आहे. तरूण व प्रौढ गटातील कर्ज प्रकरणे सादर करतानाही नवउद्योजगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कुठल्याही बँकेतून सहज कर्ज उपलब्ध होत नसल्याने ‘नको ते कर्ज आणि नको तो स्वयंरोजगार’, असे म्हणण्याची वेळ बेरोजगार युवक-युवतींवर येत असल्याचे दिसते. खासगी बँकांमार्फत मुद्रा कर्ज प्रकरणे स्वीकृतच केली जात नसल्याच्या तक्रारीही बेरोजगार युवक करतात. जिल्हा अग्रणी बँक तथा जिल्हाधिकारी यांनी बेरोजगारांच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत कर्जाचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी युवकांतून होत आहे.दोन महिने केवळ कागदांवरच कर्जशासनाच्या आवाहनानुसार युवक-युवती नोकरीच्या मागे न लागता आपला स्वयंरोजगार सुरू करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत कर्ज मिळावे म्हणून अर्जही करतात. संपूर्ण कर्ज प्रकरण बँकांतील कर्मचाºयांना विचारणा करूनच सादर केले जाते. असे असले तरी कर्ज प्रकरण सादर केल्यानंतर बेरोजगार, नवउद्योजक युवक-युवतींना एक-दोन महिने केवळ कागदपत्रांसाठी चकरा मारण्यास बाध्य केले जाते. हा प्रकार वर्धा शहरासह अनेक ठिकाणी पाहावयास मिळतो. याबाबत वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रारी केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने युवकांमध्ये नैराश्य येत असल्याचे दिसून येत आहे. बँकांना युवक कर्ज बुडवतील, ही भीती असल्याने कर्ज दिले जात नसल्याचे सांगितले जाते. हे चित्र पालटण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.