शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेताचा ताबा सोडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांकडून दबाव

By admin | Updated: June 20, 2014 00:01 IST

नजीकच्या वरूड (साती) येथील सखाराम बिजाराम कुडमते (६५) हे आदिवासी शेतकरी गत ३५ ते ४० वर्षांपासून वरूड येथील ०.८९ आर. जमिनीवर शेती करीत आहे़ यातूनच त्यांच्या कुटुंबाचे गुजराण होत आहे़

मोझरी (शे़) : नजीकच्या वरूड (साती) येथील सखाराम बिजाराम कुडमते (६५) हे आदिवासी शेतकरी गत ३५ ते ४० वर्षांपासून वरूड येथील ०.८९ आर. जमिनीवर शेती करीत आहे़ यातूनच त्यांच्या कुटुंबाचे गुजराण होत आहे़ यात अस्मानी व सुलतानी संकटामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. या परिक्षेत्रातील वनकर्मचारी या जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी दबाव आणत आहेत़ या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़तुम्ही वाहत असलेल्या जमिनीचा पट्टा वनविभागाच्या क्षेत्रात आहे़ तुम्ही जमिनीचा ताबा सोडा, असे वनकर्मचारी सांगत आहेत़ हे वाक्य ऐकून कुडमते यांना धक्काच बसला़ निरक्षर असलेले सखाराम कुडमते हे गत ३५ ते ४० वर्षांपासून सदर जमिनीवर शेती करीत आहे़ गावस्तरावर वनहक्क समितीच्यावतीने ही जमीन कुडमते यांना वाहू देण्यात यावी, या ठराव पारित करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे़ तो प्रस्तावित असल्याचे समजते़ २००९ मध्ये ग्रा.प. प्रशासनानेही याबाबत नाहरकत दिले आहे़ २०११ मध्ये जिल्हा वनहक्क समितीकडे अर्ज सादर करण्यात आला होता; पण त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. शिक्षणाचा गंध नसलेले सखारामजी पारंपरिक पद्धतीने ०.८९ आर जमीन गत ३५ ते ४० वर्षांपासून कसत आहे़ नापिकीमुळे परिसरातील शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढून शेतकरी आत्महत्या वाढत आहे़ यातच शासकीय कर्मचारी निरक्षर आदिवासी शेतकऱ्यांचे उदनिर्वाहाचे साधन हिसकावत असतील तर शेतकऱ्याने कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ सदर परिक्षेत्राचे वनकर्मचारी गत काही दिवसांपासून वरूड येथील शेतकरी कुडमते यांना शेताचा ताबा सोडण्यासाठी दबाव आणत आहेत़ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे़(वार्ताहर)