शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयटी गुन्ह्याच्या तपासाकरिता पथक तयार

By admin | Updated: August 27, 2016 00:19 IST

एटीएमचा कोड विचारत फसवणूक करण्याचे अनेक प्रकार वर्धेत घडले आहेत. या गुन्ह्यांपैकी १६ गुन्ह्यांचा अभ्यास केला

१० कर्मचाऱ्यांच्या पथकाकडे १६ गुन्ह्यांचा तपास : बिहार व झारखंड येथे लिंक वर्धा : एटीएमचा कोड विचारत फसवणूक करण्याचे अनेक प्रकार वर्धेत घडले आहेत. या गुन्ह्यांपैकी १६ गुन्ह्यांचा अभ्यास केला असता त्यांची लिंक बिहार व झारखंड या राज्यात असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याच्या तपासाकरिता वर्धा पोलिसांचे १० कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले असून ते लवकरच या मोहिमेवर जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.सध्याचे युग संगणकीय युग म्हणून ओळले जात आहे. याचा जेवढा लाभ होत आहे तेवढेच नुकसान होत असल्याचे समोर येत आहे. नागरिकांकरिता आर्थिक व्यवहार सोयीचे व्हावे याकरिता विविध बँकांकडून एटीएमची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेतूनही नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. ही फसवणूक आॅनलाईन होत असल्याने यातील एका गुन्ह्याचा शोध घेणे पोलिसांकरिता अवघड जात असल्याचे समोर आले. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी जिल्ह्यातील आठही तालुक्यात घडलेल्या घटना एकत्र करून त्याचा अभ्यास करून या सर्वच गुन्ह्याचा एकच वेळी तपास करणे शक्य असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली. यावर पोलीस अधीक्षकांनी या कल्पनेला हिरवी झेंडी देत पथक नेमण्याची परवानगी दिली आहे. यानुसार जिल्ह्यातील २० पैकी ज्या ठाण्यात असे गुन्हे घडले त्याची माहिती घेतली. यातील १६ प्रकरणाचा अभ्यास करण्यात आला असता त्यांची लिंक बिहार व झारखंड राज्यातील विविध भागात असल्याचे दिसून आले. यामुळे या प्रकरणाचा तपास करणे सायीचे होईल, असे वाटले. यावरून १० कर्मचाऱ्यांच्या दोन चमू तयार करण्यात आल्या आहेत. यातील पाच कर्मचारी बिहार व पाच कर्मचारी झारखंड राज्यात जात तपास करणार असल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)