शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष उत्सव बंदोबस्ताकरिता पोलीस प्रशासन सज्ज

By admin | Updated: December 30, 2016 00:39 IST

आगामी २०१७ नववर्ष व सन २०१६ वर्षाच्या निरोपाकरिता मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो.

दारूबंदीच्या कारवाईकरिता ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ वर्धा : आगामी २०१७ नववर्ष व सन २०१६ वर्षाच्या निरोपाकरिता मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. सदर उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता वर्धा जिल्हा पोलीस दल सुसज्ज आहे. सदर कार्यक्रमामध्ये व जल्लोष करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. वर्धा जिल्यात मद्य पिवून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना प्रतिबंध करण्याकरिता ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्र रुजू करण्यात आले आहे. येत्या काळात प्रभावी अंमलबजावणीकरिता या यंत्राचा वापर करून मद्य पिवून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. नियमबाह्यरित्या मोठ्या आवाजात संगीत व वाद्य वाजवून नियमांचा भंग करणाऱ्यांवर प्रतिबंध करण्याकरिता शासन अधिकृत ध्वनीमापन यंत्रे जिल्हा आस्थापनेवर नव्याने रुजू करण्यात आलेली आहेत. नववर्ष उत्सव काळादरम्यान त्याद्वारे मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपके व डीजेचा नियमबाह्य वापर करण्याऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे. नववर्ष उत्सवादरम्यान वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना बंदोबस्ताकरिता नेमून जिल्ह्यात अप्रिय घटना होणार नाही याची खबरदारी वर्धा पोलिसांमार्फत घेण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अप्रिय घटनांबाबत तात्काळ नियंत्रण कक्ष वर्धा येथे माहिती देण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे. (प्रतिनिधी)