शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी पाहुण्यांनी गजबजले जिल्ह्यातील तलाव

By admin | Updated: December 8, 2015 02:48 IST

हिवाळ्यांच्या दिवसात अनेक पक्षी स्थलांतरण करतात. यातील काही पक्षी वर्धेतील विविध तलावांवर दिसत आहे. एरव्ही

वर्धा : हिवाळ्यांच्या दिवसात अनेक पक्षी स्थलांतरण करतात. यातील काही पक्षी वर्धेतील विविध तलावांवर दिसत आहे. एरव्ही शांत राहत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील बऱ्याच तलावांवर या विविधरंगी पक्ष्यांच्या किलबिलाटाने चैतन्य निर्माण झाले आहे. येथील बहार नेचर फाऊंडशेनच्यावतीने पक्ष्यांच्या नोंदी संकलनास प्रारंभ झाला आहे. त्यांच्याकडून साप्ताहिक पक्षीनिरीक्षणसोबतच सध्या विविध तलावांना भेटी देणे सुरू झाले आहे. बर्फाच्छादित वा अतिकडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याकरिता व खाद्याच्या शोधार्थ शीतकटीबंधीय प्रदेशातून समशितोष्ण प्रदेशात पक्षी स्थलांतर करीत असतात. हजारो किलोमीटर अंतर पार करून पक्षी नियमित वर्धा जिल्ह्यातील विविध भागात येत असल्याच्या नोंदी यापूर्वी झाल्या आहेत. जिल्ह्यातील नलदमयंतीसागर, वरूड बगाजीसागर (लोअर डॅम), धामप्रकल्प, पोथरा प्रकल्प यासह अनेक छोट्या-मोठ्या तलावावर हे पाहुणे दिसून येत आहेत. यात प्रामुख्याने चक्रवक, स्वर्गया, चक्रांग, लालसरी, पट्टकादंब, शेंडीबदक, गढवाल, चांदी, पिवळ्या डोक्याचा परीट, कवड्या परीट, करडा परीट, शेकाटे, कंठीटिटवा, छोटा आर्ली, नदीसुरय, तुतारी, पाणलावा, मिनाखाई घार यासह रंगीत करकोचा, पांढरा शराटी, चमचा, सामान्य चिपचाप, शंकर, भारतीय पाणकावळा, बूटेड ईगल आदी विविध प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत. एरव्ही समुद्रकिनाऱ्यावर आढळणारा पण स्थलांतरा दरम्यान विसावा घेतलेला काळ्या डोक्याचा कुरवची (ब्लॅक हेडेड गल) नोद येथे झाली आहे. तसेच राखी डोक्याच्या टिटवीचे (ग्रे हेडेड लॅपविंग) अवचित दर्शन झाले आहे.बहार नेचर फाऊंडेशन गेली एक-दीड वर्षांपासून सातत्याने साप्ताहिक पक्षीनिरीक्षण हा उपक्रम राबवित आहे. या हिवाळी पाहुण्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्य दृष्टीने बहारने नोंदी संकलनास प्रारंभ केला आहे. या देखण्या पाणपक्ष्यांचे निरीक्षण करण्याकरिता निसर्ग प्रेमींनी-विद्यार्थ्यांनी साप्ताहिक पक्षीनिरीक्षण उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही बहार नेचर फाऊंडेशनने केले आहे.या कामात किशोर वानखडे, रमेश बाकडे, रवींद्र पाटील, दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, डॉ. बाबाजी घेवडे, संजय इंगळे तिगावकर, जयंत सबाणे, पराग दांडगे, दीपक गुढेकर, डॉ. जयंत वाघ, स्रेहल कुबडे, वैभव देशमुख, अविनाश भोळे, बी.एस. मिरगे, विनोद साळवे, अश्विन श्रीवास, पार्थ वीरखडे, नम्रता सबाणे, अवंतिका भोळे, सारिका मून, सारांक्ष फत्तेपुरिया, राहुल वकारे, राजदीप राठोड, दर्शन दुधाने यासह अनेक पक्षी अभ्यासकांनी परिसरातील तलावांवर पक्षिनिरीक्षणाच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)