शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कारागृहात कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

By admin | Updated: August 14, 2014 23:51 IST

क्षुल्लक कारणावरुन पाच कैद्यांनी मिळून एका पोलीस शिपायाला मारहाण केली. यामध्ये सदर पोलीस शिपायाचा पोशाखही फाटला. ही घटना वर्धेतील जिल्हा कारागृहात गुुरवारी सकाळी ९

पाच जणांवर गुन्हे : कारागृह प्रशासनात खळबळवर्धा : क्षुल्लक कारणावरुन पाच कैद्यांनी मिळून एका पोलीस शिपायाला मारहाण केली. यामध्ये सदर पोलीस शिपायाचा पोशाखही फाटला. ही घटना वर्धेतील जिल्हा कारागृहात गुुरवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पाचही कैद्यांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृह अधीक्षकांच्या आदेशानुसार सर्व कैदी त्यांच्या बॅरेकमध्ये आहेत अथवा नाही याची शहानिशा करण्यासाठी पोलीस कर्मचारी विठ्ठल उगले (४४) गेले. दरम्यान, कारागृहात कैदी म्हणून असलेले सचीन श्रीवास्तव, मनीष डहरवाल, निलेश डहरवाल, महोम्मद सलिम वल्द अब्दुल व दिलीप उर्फ सनी उमेश सराटे हे पाच जण आपल्या बॅरेकमध्ये नव्हते. सदर शिपायाने शोध घेतला असता हे पाचही जण दुसऱ्या बॅरेकसमोर फिरत असल्याचे दिसून आले. यावरून शिपाई उगले याने त्यांना हटकले. या क्षुल्लक कारणावरुन त्या कैद्यांनी शिपायाशी वाद घातला. अंगावर धावत जावून शिपायाचा पोशाख फाडला. प्रकरण इथेच न थांबता त्या पाचणी जणांनी मिळून पोलीस शिपायाला मारहाण केली. या प्रकरणी त्या पाचही कैद्यांविरुद्ध शहर ठाण्यात कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४५, १४७, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्याते आले. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)