शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

‘थर्टी फर्स्ट’वर पोलिसांची करडी नजर

By admin | Updated: December 23, 2014 23:08 IST

थर्टीफर्स्टला दारू पिऊन कुठे धिंगा घालाल तर सावधान. शिवाय दारूच्या नशेत वाहन चालविणेही महागात पडणार आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरात वा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता

वर्धा : थर्टीफर्स्टला दारू पिऊन कुठे धिंगा घालाल तर सावधान. शिवाय दारूच्या नशेत वाहन चालविणेही महागात पडणार आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरात वा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत पोलिसांनी कंबर कसली आहे. या दिवशी दारू ढोसणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याकरिता ठिकठिकाणी जल्लोष असतो. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी या दिवशी मोठ्या प्रामणात दारू शहरात येते व ती शौकिणांपर्यत पोहोचतेही. शहरातील हॉटेल्स व धाब्यांचा मद्य प्राशनाकरिता वापर होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. यावर आळा घालण्याकरिता या हॉटेल्स मालकांना नोटीसी बजावण्यात आल्या आहे. या हॉटेलात मद्य प्राशन दुचाकीने येत शहरात हुल्लड करणारेही अधिक असतात. परिणामी अपघाताची शक्यता बळावते. मद्यधुंदीत वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. कारवाईकरिता जिल्ह्यात असलेल्या विशेष दारूबंदी पथकाच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. जिल्ह्यात दारूबंदी करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या पथकात एकूण ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्थितीत शहरात दारू येणार नाही व मद्यधुंदीत कोणता अपघात घडणार नाही याकरिता कारवाई करण्याची ताकीद जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या दिवसाला सतर्कता म्हणून रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर करडीनजर ठेवण्यासह पर्यटन स्थळ परिसरातही गस्त करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)