शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा शाळांवर होणार कारवाई

By admin | Updated: December 10, 2015 02:21 IST

शासनामार्फत सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी लादण्यात आली आहे.

वर्धा : शासनामार्फत सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी लादण्यात आली आहे. या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयापासून १०० यार्डच्या आतमध्ये तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवरही पायबंद घालण्यात आला आहे. या निर्णयाची अंबलबजावणी व्हावी म्हणून आता थेट शाळा, महाविद्यालयांवरच कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. ही कारवाई टाळण्यासाठी सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थांची दुकाने शाळा, महाविद्यालय परिसरात आढळल्यास संबंधित संस्था चालक, मुख्याध्यापक व शिक्षकांनीच ते हटविणे गरजेचे झाले आहे.शासनाने सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थांच्या शाळा, महाविद्यालय परिसरात होणाऱ्या विक्रीवर बंदी घातली आहे. याबाबत संबंधित शिक्षक संस्थांना फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. यावरून अनेक ठिकाणी फलक लागले तर काही शाळा, महाविद्यालयांत अद्यापही फलक दिसत नाही. यामुळेच कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तंबाखू वापरावर प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००६ चे कलम अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. यानुसार शालेय संस्थेच्या आवारापासून १०० यार्डच्या आत तंबाखुजन्य उत्पादनाची विक्री करणे व शाळेत तंबाखुजन्य वातावरण तयार करणे, यावर कडक प्रतिबंध लावण्यात आलेत. असे केल्यास मुंबई पोलीस अधिनियम कलम ११६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार राज्यात २.५ कोटी लोक तंबाखूचा वापर करतात. जगात प्रत्येक वर्षी ५० लाख व भारतात अंदाजे १० लाख लोक तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांनी मृत्युमूखी पडतात. हृदयरोग, तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचे आजार तसेच इतर असंर्गजन्य रोगाचे कारण तंबाखुचा वापर आहे. तंबाखु सेवन करून थुंकल्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. शिवाय त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन कर्करोग, श्वसन, पुनरूत्पादन संस्था, पचनसंस्था आदी प्राणघातक आजारांची लागण होते.तंबाखु, तंबाखुजन्य पदार्थापासून होणाऱ्या दुष्परिणामापासून मुक्त समाज निर्मितीसाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. यासाठी युवक, नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)