शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ घाटमालकाच्या अटकेचे आदेश

By admin | Updated: June 5, 2017 01:03 IST

तहसीलदारांनी पकडलेला अवैध रेतीचा ट्रक गुन्हा दाखल करून सेलू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.

रेती भरलेला ट्रक सोडल्याचे प्रकरण : एसपींनी केल्या सूचना लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तहसीलदारांनी पकडलेला अवैध रेतीचा ट्रक गुन्हा दाखल करून सेलू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. मात्र पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांनी यात व्यवहार करून तो ट्रक सोडला. तर रेती घाटमालकाला अभय दिले. या प्रकरणाचा ‘लोकमत’ने पाठपुरावा करीत प्रकरण उजेडात आणले. याची दखल घेत खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाची माहिती घेत मोकाट फिरत असलेल्या त्या घाटमालकाला अटक करण्याच्या सूचना केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. मात्र त्याने अटकपूर्व जामिनाकरिता न्यायालयात अर्ज केल्याने अटक तुर्तास टळली. घाटमालकाकडून चिरीमिरी घेणाऱ्या या ठाण्यातील सदर प्रकरणाच्या तपासी अधिकाऱ्यांकडून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होते किंवा त्या आदेशावर झालेला व्यवहार जड होतो, याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांना झालेल्या व्यवहाराची कल्पना आल्याने त्यांनी केवळ रेती घाटाचा मालकच नाही तर त्याच्या दिवानजीलाही तात्काळ अटक करण्याचे आदेश दिल्याचे कळते. या प्रकरणातील अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी सत्यता जाणून तपासी अधिकाऱ्यांकडून केवळ अर्थपूर्ण व्यवहारामुळे कशी लपवाछपवी होत आहे याची खात्री केल्याची माहिती आहे. याची माहिती त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतर त्यांनी तपासी अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून चांगलेच सुनावल्याची माहिती आहे. अटकपूर्व जामिनाकरिता आरोपी न्यायालयात या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला मेनखत येथील घाटमालकाने अटक टाळण्याकरिता अटकपूर्व जामीन मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्याने न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून तपासी अधिकारी शुभांगी ताकीत यांना आरोपीस अटक करून हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांची चमू कारवाईकरिता गेली असता त्यांनी याप्रकरणी न्यायालयात जामीनासाठी केलेला अर्ज दाखविला. त्यावर सोमवारी (दि.५ जून) पोलिसांचे मत मागितले आहे. त्यानुसार पुढील कारवाई होईल. - संजय बोथे, ठाणेदार, सेलू.