शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘वॉच’

By admin | Updated: June 10, 2015 02:16 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यांदाच क्लोज सर्किट कॅमेरे बसविले आहेत. यासोबतच मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर ये-जा करण्याचे मार्गही बंद करण्यात आले आहेत.

कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे तैनात : कामचुकारपणावर अंकुश बसणारराजेश भोजेकर वर्धाजिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यांदाच क्लोज सर्किट कॅमेरे बसविले आहेत. यासोबतच मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर ये-जा करण्याचे मार्गही बंद करण्यात आले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून विना कामाने होणारी वर्दळ थांबणार असून प्रशासनातील कामचुकारपणावरही आपसुकच अंकुश बसणार आहे. लालफितशाहीचा फटका नेहमीच सामान्य नागरिकांना बसतो. शासकीय कार्यालयात चकरा मारुन सर्वसामान्य अखेर थकून जातो; मात्र काम होत नाही, हा नेहमीचाच अनुभव. जर अधिकाऱ्याचा प्रशासनावर वचक असेल, तर कामांनाही गती मिळते, असा प्रत्यय सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नवे जिल्हाधिकारी म्हणून आशुतोष सलील यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी त्यांचा प्रशासकीय बाणा दाखविणे सुरू केले आहे. यामुळे प्रशासनातील कामांना गती आल्याचा अनुभव आता नागरिकांनासह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनासुद्धा येत आहे. तसे आपसात बोलत आहे.आशुतोष सलील यांनी रूजू झाल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुरु असलेल्या बैठकांच्या माध्यमातून त्यांच्या कामाची पद्धतच लक्षात येत आहे. कोणती कामे करायचीय. किती वेळातच करायचीय, याचे नियोजन करा. काम होत नसेल, तर मला सांगा, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. यासोबत फाईली धूळखात राहू नये, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. यानंतर यंत्रणा खळबडून जागी झाली. फाईलीचा प्रवासही सुपरफास्ट झाला. आता जिल्हाधिकारी कार्यालयातील हालचालींवरही जिल्हाधिकाऱ्यांनी आपले लक्ष केद्रीत केल्याचे दिसते. कार्यालयाच्या प्रवेश द्वारापासून तर आतील भागात ठिकठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे मंगळवारपासून सक्रिय झाल्याची माहिती सूत्राने दिली. विविधा इमारतीतील सेतू केंद्रही कॅमेऱ्याच्या निगराणीत आले आहे. सेतू केंद्रातील दलालांचा वाढता सुळसुळाटही बंद होण्याच्या आशा बळावल्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मागील बाजूचा दरवाजाही आता कायमचा बंद करण्यात आला आहे. कुणालाही जिल्हाधिकारी कार्यालयात आता मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करावा लागणार आहे. यामुळे आपसुकच नागरिकांसह अधिकारी आणि कर्मचारीही या कॅमेऱ्यांच्या दृष्टीस पडणार आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांचा थेट वॉच असेल. यामुळे यंत्रणेतील कामचुकारपणा उघड होणार आहे. मुख्य प्रवेशद्वारावरही आता पोलीस कर्मचारी तैनात आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला शिस्त लागतील, असे बोलले जात आहे.