शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

न.प. शिक्षक, कर्मचाऱ्यांचा खासदारांनी घेतला वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:54 IST

स्थानिक न.प.शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून आयोजित सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून खासदार रामदास तडस यांनी उपस्थितांना शिस्तीत राहण्याचे बाळकडू पाजले. यावेळी न.प.शाळेचा वर्ग दहावीचा खालावलेला निकाल तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मनमाजी पणाचा आढावा घेऊन वेळीच सुधार होण्यासाठी धडे देण्यात आले.

ठळक मुद्देसंडे अँकर । आढावा बैठक व सत्काराच्या कार्यक्रमात शिस्तीत राहण्याचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक न.प.शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून आयोजित सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून खासदार रामदास तडस यांनी उपस्थितांना शिस्तीत राहण्याचे बाळकडू पाजले. यावेळी न.प.शाळेचा वर्ग दहावीचा खालावलेला निकाल तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मनमाजी पणाचा आढावा घेऊन वेळीच सुधार होण्यासाठी धडे देण्यात आले.न. प. सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून खासदार रामदास तडस व अतिथी म्हणून न. प. गटनेता शोभा तडस, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती नंदू वैद्य, मारोती मरघाडे, मिलिंद ठाकरे तसेच नगरसेविका कल्पना ढोक, सारिका लाकडे, संध्या कारोटकर, सुनीता ताडाम, सुनीता बकाणे व विजय गोमासे यांची उपस्थिती होती. न.प.सभागृहात खासदार रामदास तडस यांचा सत्कार व न.प.कार्यालयीन कर्मचारी व शिक्षक यांची आढावा बैठक असा दुहेरी कार्यक्रम आयोजित होता. सर्वप्रथम न.प. माध्यमिक-प्राथमिक शाळेचे शिक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वतीने खासदार तडस यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर आढावा बैठक घेऊन उपस्थित कर्मचारी व शिक्षकांच्या कामासंबंधी माहिती जाणून घेण्यात आली.पालिकेच्या माध्यमिक शाळेतील दहावीच्या ३७ टक्क्यांपर्यंत खालावलेल्या निकालाबाबत मंथन करण्यात आले. शिक्षकांचा वेळकाढूपणा व मनमानी कारभार याला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. कर्मचाºयांवर कुणाचाही वचक राहिला नसल्याने त्यांची नेहमीची उपस्थिती नगण्य ठरली आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाºया नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब उपस्थित नगरसेवकांनी खासदार तडस यांच्या लक्षात आणून दिली. शिक्षक भरतीअभावी विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान, प्राथमिक शाळेतील पिण्याच्या पाण्याची गैरव्यवस्था, पतंप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना उर्वरित पैशाचे वाटप तसेच नवीन लाभार्थ्यांची नोंदणी, कार्यालयीन कर्मचाºयांची भरती तसेच प्राथमिक शाळांची पटसंख्या कायम ठेवण्यासाठी नवीन बालवाड्या सुरू करण्याबाबत बैठकीत विचार-विनिमय करण्यात आला.शैक्षणिक कार्यात व कार्यालयीन कामकाजातील दिरंगाई खपवून न घेता प्रशासकीय वचक ठेवण्यात यावा, कुणाचेही भय न ठेवता कारवाईचा बडगा उगारण्यात यावा असे विचार खासदार तडस यांनी यावेळी व्यक्त करून कर्मचाºयांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा केली. यावेळी न. प. माध्यमिक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक शाळेचे शिक्षक, न.प.कार्यालयीन कर्मचारी व विविध विभागातील कर्मचाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस