दुचाकीसह ७७ हजारांचा दारुसाठा जप्त : दोन दारूविक्रेत्यांना अटकवर्धा : दारूसाठा लपविण्यासाठी दारूविके्रते काय करतील, याचा नेम राहिला नाही़ शहरातील एका दारूविक्रेत्याने नवीनच क्लृप्ती शोधून काढली आहे़ देवघरात कुणी तपासणी करणार नाही, असा गैरसमज करीत सदर दारूविक्रेत्याने चक्क घरातील देवघरातील फोटोखाली खड्डा करून दारू लपवून ठेवली होती़ पोलिसांनी ही दारू जप्त केली़ ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली़घरात दारूसाठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लिंगाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक साबळे, राजू दहिलीकर, नामदेव किटे, विलास गमे, संतोष जयस्वाल, वैभव कट्टोजवार व हरिदास काकड यांनी दारूविक्रेता मनोज कंजर याच्या घरी धाड टाकली़ यात घरातील देवघराची झडती घेतली असता फोटोखाली खड्डा असल्याचा संशय आला़ यावरून पोलिसांनी फोटो खाली असलेला खड्डा खणला असता विदेशी दारूचा साठा आढळून आला़ यात पोलिसांनी १० हजार ६०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला़ या प्रकरणी शहर पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी मनोज कंजर यास ताब्यात घेतले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
दारूसाठी आता देवघराचा आधार
By admin | Updated: September 3, 2014 23:36 IST