शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची फुंकर नको वीज, पाणी द्या-वाघोडावासी

By admin | Updated: July 21, 2015 02:50 IST

कर्जमाफीसाठी गाव विकायला काढल्यामुळे एका रात्रीतून शासन-प्रशासनासह राज्यभरातील जनतेचे लक्ष वेधलेल्या

वर्धा : कर्जमाफीसाठी गाव विकायला काढल्यामुळे एका रात्रीतून शासन-प्रशासनासह राज्यभरातील जनतेचे लक्ष वेधलेल्या वाघोडावासीयांनी खा. रामदास तडस यांच्याशी सोमवारी झालेल्या सुसंवादानंतर आपली भूमिका मवाळ केली आहे. कर्जमाफीची फुंकर घालण्यापेक्षा वीज आणि पाणी देऊन कायमस्वरुपी तोडगा काढा, असा सूर यावेळी आवळला. खा. तडस यांनीही लगतच्या खैरी कार प्रकल्पाचे पाणी आणि आठ दिवसांत वीज पुरवठ्यासाठी आवश्यक कामे पूर्णत्वास नेण्याचा शब्द दिला.वाघोडा येथे खा. रामदास तडस यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. तब्बल तीन तास ही चर्चा चालली. खा. तडस यांनी गावकऱ्यांना मोकळ्या मनाने आपल्या भूमिका मांडण्याचा सल्ला देतानाच कर्जमुक्ती पाहिजे वा कायम स्वरुपी तोडगा निघाला पाहिजे, असा सवाल केला. तेव्हा गावकऱ्यांनी तात्पूरती कर्जमाफी देऊन जखमेवर फुंकर घालण्यापेक्षा लगतच्या खैरी कार प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळावे, तसेच शेतीतील कृषी पंपासाठी वीज पुरवठा करण्याची मागणी केली. या गोष्टींची पूर्तता झाल्यास गावातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील, असा सूर गावकऱ्यांनी यावेळी काढला. तसेच शेतात टॉवर उभारले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपये देऊन बोळवण केली जात आहे. तेव्हा योग्य तो मोबदला मिळवून दिल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे समाधान होईल. तसेच वन्य जिवांचा त्रास थांबविण्यासाठी तारेचे कुंपण द्यावे, याकडेही गावकऱ्यांनी लक्ष वेधले. यावेळी खा. तडस गावकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, येथील शेतीला खैरी कार प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न अल्पकाळात मार्गी लावणार असल्याचे सांगतानाच संबंधित अधिकाऱ्यांना आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन४जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. दोन दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. खा. रामदास तडस हे वाघोडा येथे जाण्यापूर्वी त्यांना शेतकरी आत्महत्येची वार्ता कळताच त्यांनी रुपचंद डोंहरे या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. आजनगाव येथे जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी४तत्पूर्वी खा. रामदास तडस यांनी आंजनगाव येथील जलयुक्त शिवार अभियानातील कामांचीही पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण मलसाने, तालुका कृषी अधिकारी महंत तसेच स्थानिक अधिकारी व गावकरी उपस्थित होते.