शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या हाडात मोडली ‘सुई’

By admin | Updated: July 13, 2015 02:09 IST

पोटात दुखत असल्यामुळे येळाकेळी येथील महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली. तिला गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करावी लागते असे सांगत दाखल करून घेण्यात आले.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार आकोली : पोटात दुखत असल्यामुळे येळाकेळी येथील महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली. तिला गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करावी लागते असे सांगत दाखल करून घेण्यात आले. शस्त्रक्रियेपूर्र्वी तिला परिचारिका गुंगीचे इंजेक्शन देत असताना सुईचा तुकडा तिच्या हाडात मोडला. त्यामुळे तीन दिवसांपासून ती महिला वेदनेने विव्हळत आहे. गुरुवारी (दि.२) दाखल झालेल्या या महिलेवर शनिवारीही शस्त्रक्रिया झाली नसल्याचे दिसून आले. सविस्तर वृत्त असे की, येळाकेळी येथील शोभा शंकर भांडेकर (५०) ही महिला पोटात वेदना होत असल्याने सामान्य रुग्णालयात आली. सर्व तपासण्याअंती व एक्स-रे रिपोर्टनुसार गर्भपिशवीचे आॅपरेशन करावे लागते. असे सांगत तिला वॉर्ड क्र. ३ मध्ये दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेची तारीख १० जुलै ठरविण्यात आली. या दिवशी तिला शस्त्रक्रिया कक्षात नेण्यात आले. शस्त्रक्रियेपूर्र्वी तिच्या कमरेच्या हाडात परिचारिकेने गुंगीचे इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन देत असताना सुईचा तुकडा महिलेच्या हाडात तुटला. ही बाब डॉक्टरांच्या लक्षात येताच शस्त्रक्रिया रद्द करून तिला वॉर्डात पाठविण्यात आले. तीन दिवसांपासून ती महिला वेदनेने विव्हळत असून तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर तिच्या तडफडण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. असे असले तरी रुग्णालयात यावेळी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून यावर उडवाउडविची उत्तरे मिळत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून हलगर्जीपणाने कळस गाठला असून याचा त्रास रुग्णांना होत असल्याची ओरड होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे.(वार्ताहर)