शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या प्रगतीसाठी सक्षम युवाशक्तीची गरज

By admin | Updated: April 14, 2017 02:12 IST

भारतातील एकूण लोकसंख्येच्या ३४ टक्के प्रमाण तरुणांचे आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या या युवाउर्जेची देशाच्या प्रगतीसाठी नितांत गरज आहे.

श्रीपाद नाईक : दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारोहवर्धा : भारतातील एकूण लोकसंख्येच्या ३४ टक्के प्रमाण तरुणांचे आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या या युवाउर्जेची देशाच्या प्रगतीसाठी नितांत गरज आहे. त्यांच्यापर्यंत पोचणारा ज्ञानाचा स्त्रोत विज्ञानदृष्टी जोपासणारा, तर्कशुध्द विचारांचा, खुल्या मनाचा, आत्मसन्मान वाढविणारा, विश्वसनीय व जबाबदारीची जाणीव करून देणाराच असला पाहिजे. देशांतर्गत या युवा शक्तीला पुरेपूर वाव मिळाला तर ही शक्ती नोकरीसाठी परपराष्ट्रांकडे न वळता देशातच आपली सेवा देईल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या आयुष खात्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षान्त समारोहात केले. सावंगी (मेघे) येथील विद्यापीठ सभागृहात आयोजित या समारोहाच्या अध्यक्षस्थानी कुलपती दत्ता मेघे होते. कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती तथा द.मे. अभिमत विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. दिलीप गोडे, प्र-कुलगुरू डॉ. व्ही.के. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ६४२ विद्यार्थ्यांना दीक्षा३४ जणांना आचार्य पदवी : ७८ जणांनी पटकाविले सुवर्ण पदकवर्धा : आयुर्वेद ही जगातील सर्वात प्राचीन उपचार पद्धती असून भारत या पारंपरिक वैद्यक पद्धतीचा मुख्य प्रवाहक आहे. परंपरेने चालत आलेल्या आयुर्वेद, योगा, निसर्गोपचार, युनानी आदी आरोग्यवर्धक उपचार पद्धती अधिक उपयुक्त शास्त्रशुद्ध आणि निर्दोष होण्याकरिता व्यापक संशोधनाची आवश्यकता आहे. भारत सरकारने यासाठी आयुष हे स्वतंत्र खाते निर्माण केले आहे, असेही यावेळी ना. नाईक म्हणाले. या समारोहात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ३४ व्यक्तींना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, पॅराविज्ञान आणि परिचर्या शाखेतील एकूण १०६ विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले. यात गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना एकूण ७८ सुवर्ण पदके व ३ रौप्य पदकांसह १३ चान्सलर अवॉर्ड आणि रोख पुरस्कार देण्यात आले. वैद्यकीय शाखेतील करिश्मा माखिजा ही विद्यार्थिनी सर्वाधिक पुरस्कारांची मानकरी ठरली. तिने १० सुवर्ण पदके व ५ पुरस्कारांवर आपली मोहर उमटविली. यासोबतच डॉ. स्नेहील गोस्वामी यांना ७ सुवर्ण पदके, जुही गुप्ता हिला ४ सुवर्ण पदके, डॉ. अनुजा आलोक राणीवाला यांना ४ सुवर्ण पदके, रोमा धांडे हिला ३ सुवर्ण पदके व १ रोख पुरस्कार, अमृता बटवे हिला १ सुवर्ण व ३ रोख पुरस्कार तर मंजू मोहन हिला २ सुवर्ण व १ रौप्य पदक प्राप्त झालेत. तर १९ विद्यार्थ्यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली. वैद्यकीय शाखेतील ३००, दंतविज्ञान शाखेतील १४९, आयुर्वेद शाखेतील ५९, परिचर्या शाखेतील ११३ त२ पॅरावैद्यकीय शाखेतील १९ विद्यार्थ्यांसह एकूण ६४२ विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांनी आरोग्यसेवेची दीक्षा दिली. मंचावर व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, आ. समीर मेघे, अशोक चांडक, डॉ. नीलम मिश्रा, मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल, कुलसचिव डॉ. ए.जे. अंजनकर, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक पखान, आयुर्वेद शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, डॉ. डी.के. अग्रवाल, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. मीनल चौधरी, डॉ. राजीव बोरले, रवी मेघे, डॉ. ललित वाघमारे, परिचारिका महाविद्यालयाचे प्राचार्य बी.डी. कुळकर्णी, भौतिकोपचार शाखेचे डॉ. सोहन सेलकर, व्यवस्थापन समितीचे राजीव यशराय, डी.एस. कुंभारे, डॉ. सुब्रत सामल, डॉ. आदर्शलता सिंग, डॉ. प्रीती देसाई, डॉ. सुनीता श्रीवास्तव, वैशाली ताकसांडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. गोडे यांनी अ‍ॅड. मनोहर व डॉ. मिश्रा यांच्या कार्याचा आलेख मांडला. डॉ. अंजनकर यांनी अ‍ॅड. व्ही.के. मनोहर यांच्या मनोगताचे वाचन केले. संचालन डॉ. तृप्ती वाघमारे व डॉ. समर्थ शुक्ल यांनी केले. समारोहाची सांगता डॉ. प्रियंका निरंजने यांनी गायलेल्या पसायदान व राष्ट्रगीताने करण्यात आली. दीक्षान्त समारोहाला मोठ्या संख्येने पदवीधर, त्यांचे पालक व शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)