शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

लँड पुलिंगच्या नावाखाली इंचभरही जमीन देणार नाही

By admin | Updated: September 17, 2016 02:22 IST

शासनाच्यावतीने नागपूर-मुंबई सुपर हायवेच्या नावाखाली कोणताही मोबदला न देता शेतकऱ्यांची जमीन लँड पुलिंगच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे वर्धा : शासनाच्यावतीने नागपूर-मुंबई सुपर हायवेच्या नावाखाली कोणताही मोबदला न देता शेतकऱ्यांची जमीन लँड पुलिंगच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ज्या भागातून हा रस्ता जाणार आहे, त्या भागातील शेतकऱ्यांची यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होणार आहे. ही फसवणूक टाळण्याकरिता लँड पुलिंगच्या नागवाखाली इंचभरही जमीन देणार नाही, असा इशारा महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनादरम्यान दिला. नागपूर-मुंबई दरम्यान दोन महामार्ग आहेत. अशातच नागपूर-मुंबई दरम्यान काही वर्षांपूर्वीच तयार झालेला आहे. या मार्गाचा आठ पदरी महामार्ग करण्याची तरतूद असताना हा तिसरा महामार्ग करून स्मार्ट सिटीच्या नावे शेतकऱ्यांची ५२ हजार एकर जमीन लुटण्याची काय गरज, असा सवाल समता परिषदेने उपस्थित केला. शेतकऱ्याला कवडीचाही मोबदला न देता केवळ दहा वर्षांनंतरची दिवास्वप्ने दाखवून त्याच्या जमिनी हडपणे हे कायद्याच्या विरोधात आहे. या धरणे आंदोलनात शेतजमिनी जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेतला होता. धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. समता परिषदेचे धरणेवर्धा : या धरणे आंदोलनात महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ पिसे, विजय मुळे, निळकंठ राऊत, सुधीर पांगुळ, कविता मुंगले, विद्या बहेकार, भरत चौधरी, संजय म्हस्के, शैलेश येळणे, जयंत भालेराव, केशव तितरे, जितेंद्र गोरडे, शंकर येलोरे, मनोज पिपंळे, रणजित देशमुख, राजू उडाण, बाबा भारती, प्रशांत लोणकर, सखुबाई येलोरे, आनंद पवार अशोक वैरागडे, राजेंद्र झिले, संगम मुंजेवार, कवडु बुरंगे, गजानन किनगावकर, श्रावण भांडेकर, प्रशांत घोंगडे, सीता घोंगडे, संजय देशमुख, पप्पु सालंकार, विनोद पारिसे, आनंद कठाणे, नागपूर-मुंबई हायवे बाधित शेतकरी व महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)