शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या कचऱ्याचा नांदगावच्या नागरिकांना त्रास

By admin | Updated: April 10, 2015 01:40 IST

नांदगाव (बोर) येथे स्थानिक नगर पालिकेचा कचराडेपो आहे़ या कचऱ्यामुळे नांदगाव येथील नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे़ ...

हिंगणघाट : नांदगाव (बोर) येथे स्थानिक नगर पालिकेचा कचराडेपो आहे़ या कचऱ्यामुळे नांदगाव येथील नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे़ गावाशेजारील कचराडेपो व त्यातील दुर्गंधी यामुळे ग्रामस्थांना टीबी, अस्थमा, कावीळ आदी आजार जडत असल्याचे निदर्शनास येत आहे़ पालिकेला कचरा डेपोसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देताना ग्रा़पं़ ने काही अटी घातल्या होत्या़ त्या अटींची पूर्तता करण्यात आली नाही़ याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे़ कचराडेपोमुळे कुठलेही दूषित पाणी, घाण व वायुप्रदूषण होणार नाही़ सदर वीज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेतून गावात पथदिव्यांना लागणारी वीज अनुदान दराने कायम स्वरूपात ग्रा़प़ ला देण्यात येईल़ गांडूळ प्रकल्पातून निर्माण होणारे गांडूळ खत नांदगावच्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कायमस्वरूपी देण्यात येईल़ या अटीवर नांदगाव ग्रा़पं़ ने प्रकल्पास मान्यता दिली; पण पालिकेने यापैकी कोणतीही अट पूर्ण केली नाही़ या डेपोमधून वाहणारे दूषित पाणी नाल्यातून थेट नांदगाव येथून नदीत जाते़ सदर पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया होत नसल्याने ते नळाद्वारे नागरिकांना मिळते़ यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे़ कावीळ, डेंग्यू, मलेरिया, टायफाईड आदी आजारांचे प्रमाण वाढले आहे़ आजारांमुळे चार रुग्णांचे बळी गेले़ या डेपोमधील चकरा सतत जळत राहिल्याने गावात दूषित वारे वाहत असते़ कुठलाही प्रकल्प सुरू नाही़ या प्रकरणी चौकशी करून नांदगाव येथील नागरिकांच्या आरोग्याची दखल घेत हा प्रकल्प अन्य हलविण्याचे पालिकेला आदेश द्यावे, अशी मागणी प्रहारने निवेदनातून केली आहे़(तालुका प्रतिनिधी)