शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर सुरूच

By admin | Updated: July 11, 2016 01:58 IST

खेडी ओसाड पडत असून शहराकडे नागरिकांचे लोंढे वाढत आहे. जिल्ह्यात १ हजार ३७६ गावांची संख्या असून खेड्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ८ लाख ७५ हजार २८४ एवढी आहे.

जागतिक लोकसंख्या दिन : जिल्ह्याचा जन्मदर १३.४३ टक्केश्रेया केने वर्धा खेडी ओसाड पडत असून शहराकडे नागरिकांचे लोंढे वाढत आहे. जिल्ह्यात १ हजार ३७६ गावांची संख्या असून खेड्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ८ लाख ७५ हजार २८४ एवढी आहे. २००१ मध्ये झालेल्या जनगणनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९ लाख ११ हजार ६९५ नागरिक वास्तव्यास होते. तर शहरातील आकडेवारी पाहता २००१ मध्ये ३ लाख २५ हजार ६९५ वरून ४ लाख २० हजार ८७३ एवढी वाढ झाल्याचे आकडे सांगत आहेत. गावांची संख्याही १ हजार ३८२ वरून १ हजार ३७६ झाली आहे.ग्रामीण भागात शेती शिवाय दुसरा व्यवसाय नसल्याने रोजगाराची समस्या भेडसावते. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय तोट्यात असल्याने रोजगाराच्या शोधार्थ अनेकांनी शहर गाठले. शासनाकडून ग्रामीण रोजगार योजना राबविली जाते. योजनेचा लाभ मिळत नसल्याची ओरड होते. शिवाय मजुरीकरिता बेरोजगारांना कार्यालयात हेलपाटा माराव्या लागत असल्याच्या तक्रारी आहेत. तुलनेने शहरात रोजगार उपलब्ध होत असल्याने शहरांचा आकार दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येतो. क्षेत्रफळासोबत लोकसंख्येतही वाढत होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १२ लाख ९६ हजार १५७ आहे. यात ६ लाख ६५ हजार ९२५ इतके पुरूष तर ६ लाख ३० हजार २३२ महिलांची संख्या आहे. लोकसंख्येची घनता २०५ आहे. २००१ मध्ये लोकसंख्येची घनता १९६ इतकी होती. २०११ मध्ये लोकसंख्या वाढीच दर १४.४७ टक्के होता. २०१५ मध्ये हा दर १३.४३ टक्क्यांवर आला. असे असले तरी २००१ मध्ये केलेल्या जनगणनेतील आकडेवारी पाहता २०११ मध्ये जिल्ह्यातील लोकसंख्या वाढली आहे. शहरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते.गावांची संख्या घटली२००१ पर्यंत जिल्ह्यातील गावांची संख्या १,३८२ होती. ती २०११ मध्ये १,३७६ पर्यंत आली आहे. जिल्ह्यात सहा नगरपालिका असून चार नगरपंचायत आहेत. या प्रत्येक शहरातील लोकसंख्येत गत १० वर्षात वाढ झाल्याचे दिसते.