शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

माँ-बाबांच्या मुलीने नई तालिमच्या स्मृतींना दिला उजाळा

By admin | Updated: November 17, 2016 00:47 IST

हिंदुस्तानी तालिम संघ, नई तालीम समिती आणि आनंद निकेतन याची जडणघडण मॉ-बाबांच्या प्रयत्नातून झाली.

मुलाखत : आशादेवी व इ.डब्लू. आर्यनायकम यांची कन्या मिता घोष यांची सेवाग्राम आश्रमला भेटदिलीप चव्हाण सेवाग्रामहिंदुस्तानी तालिम संघ, नई तालीम समिती आणि आनंद निकेतन याची जडणघडण मॉ-बाबांच्या प्रयत्नातून झाली. मॉ-बाबा पुरस्काराच्या माध्यमातून २९ वर्षानंतर सेवाग्राम आश्रमला भेट देण्याचा योग आला. आनंद निकेतनच्या संस्काराची शिदोरी जीवनभर सोबत राहील. सध्या अमेरिकेत राहत असली तरी आनंद निकेतनची विद्यार्थिनी असल्याचे सांगताना अभिमान वाटतो, असे मिता घोष यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मॉ-बाबा म्हणजेच नई तालीमचे शिल्पकार आशादेवी व इ.डब्लू. आर्यनायकम यांची कन्या मिता घोष या पुरस्काराच्या वितरणाकरिता सेवाग्राम येथे आल्या. आश्रम परिसराला भेट दिल्यावर त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्मृतींना उजाळा दिला. मिताताई यांचे बालपण नई तालीम परिसरात गेले. महात्मा गांधी यांचा सहवास त्यांना लाभला. याबाबत सांगताना त्या म्हणाल्या, स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना देशातील मोठ-मोठी नेतेमंडळी आश्रमात येत होते. बापूजींकडे नेहमी येणे-जाणे असल्याने मी दारात उभी दिसले की बापू हसून आत बोलवायचे. तीन बंदर दाखवून एखादी गोष्ट सांगायचे. स्वातंत्र्य चळवळीत व्यस्त बापंूकडे लहान मुलांसाठी वेळ राहत होता. त्यांना भेटण्यात विशेष आनंद होता. पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजनी नायडू, राजेंद्रप्रसाद यांना जवळून पाहिले. त्यांच्याकडून बरेच शिकता आले, असे त्यांनी सांगितले.नई तालीम कुटीतील त्यांचे घर आणि येथे लावलेले मॉ-बाबाचे छायाचित्र न्याहाळताना त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. १९३७ मध्ये हिंदुस्तानी तालिम संघ, नई तालीमची शाळा माँ बाबा यांच्या देखरेखीखाली सुरू झाली. विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी हा परिसर सदैव भरलेला असत. नई तालीम आणि आश्रम हा एक परिवार वाटायचा. येथे सर्व जाती व धर्माचे विद्यार्थी शिकतात. माझ्या आई वडिलांना ते माँ बाबा असेच म्हणायचे. त्यामुळे कुटुंब ही संकल्पना आम्हाला माहिती नव्हती आमचा परिवार होता, हेच संस्कार आयुष्यभराची शिदोरी ठरले.अमेरिकेत सुरू केली बालवाडीयेथे पहाटेपासून सुरू होणारी दिनचर्या सायंकाळी प्रार्थना व अभ्यासानंतर समाप्त होत असे. स्वच्छता, बागवानी, सुतकताई, बुनाई, स्वयंपाक, गोशाळा अशी सर्व प्रकारची कामे विद्यार्थी दशेत केलीत. लग्न झाल्यानंतर पतीसोबत जर्मनी व अमेरिका येथे गेले. अमेरिकेतील डिट्राईट येथे नई तालीमच्या संस्कारावर आधारीत बालवाडी सुरू केली. ३५ वर्षे शिक्षिकेचे काम केले. ८२ वर्षांच्या असलेल्या मिता घोष यांच्या सेवाग्राम आश्रम येथील आगमनाने जुन्या आठवणी ताज्या झाल्या. यावेळी त्यांनी आप्तांच्या आवर्जून भेटी घेतल्या. आश्रमात आमचा परिवार आहे, असे सांगायला त्या विसरल्या नाहीत.