महिला व बालकांवर हल्ले : गावात सर्वत्र दहशतसेलू : नजीकच्या घोराड गावात वानरांनी धुमाकूळ घातला असून यातील एका माकडाने नागरिकांवर जावून पडण्याचा सपाटा आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. या माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.विठ्ठल रुखमाई मंदिरासमोर असलेल्या वटवृक्षावर माकडांचे साम्राज्य सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या घरांवरील कवेलूचा चुराडा होत आहे. यापैकी एक माकड सरळ घरात शिरून खाण्याचा वस्तू लंपास करीत आहे. दोन दिवसांपूर्वी या माकडाने चार महिलांवर आणि काही बालकांवर हल्ला चढविला होता. यात ते किरकोळ जखमी झाले होते. परिणामी गावात या माकडाची दहशत वाढली आहे.वनविभागाने याची दखल घवून या वानराला पकडण्यासाठी त्वरित पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा माकडाच्या दहशतीत वावरणाऱ्यांना पुन्हा जखमी होण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक प्रशासनानेही याची दखल घेण्याची गरज आहे. ही माकडे गावाजवळील शेतांमध्येही आपला ठिय्या मांडून पिकांची नासाडी करीत आहे. पिके जोमने वाढत आहे. सोयाबीन शेंगांवर आले आहे. त्यामुळे माकडे शेतात हैदोस घालत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. या माकडांना जंगलात पिटाळून लावावे आणि होणारा त्रास व हानी थांबवावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.(शहर प्रतिनिधी)महिला व मुले किरकोळ जखमीअनेक दिवसांपासून घोराड येथील मंदिर परिसरात माकडांचा हैदोस वाढला आहे. येथील महाकाय वटवृक्षावा य माकडांचा ठिय्या असतो. येथून घरांवर काय वाळत आहे अंगणात काय ठेवले आहे हे माकडांचा चांगल्या प्रकारे दिसते. काहीच दिवसांपूर्वी येथील चार महिला व काही बालकांवर एका माकडाने हल्ला चढविला होता. यात ते किरकोळ जखमी झाले. परिणामी गावात या माकडाची दहशत वाढली आहे.परिसरातील शेतांमध्येही या माकडांचा हैदोस वाढला असून पिकांचे नुकसान सदर माकड करीत आहे.
माकडांच्या हैदोसाने ग्रामस्थ झाले त्रस्त
By admin | Updated: August 26, 2015 02:17 IST