शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मोका पाहणी झाली; पण शेतकऱ्याला मदतच नाही

By admin | Updated: December 20, 2014 22:45 IST

दीड वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील एका शेतकऱ्याची कपाशीची लागवड केलेले संपूर्ण शेत खरडून गेले़ या शेताची प्रत्यक्ष मोक्का पाहणी कृषी सेवकाने केली; पण नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव मदत

केळझर : दीड वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील एका शेतकऱ्याची कपाशीची लागवड केलेले संपूर्ण शेत खरडून गेले़ या शेताची प्रत्यक्ष मोक्का पाहणी कृषी सेवकाने केली; पण नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव मदत यादीत आलेच नाही़ यामुळे शेतकऱ्याला मानसिक धक्का बसला़ कृषी सेवकाच्या सदोष कार्यप्रणालीमुळे पिडीत शेतकऱ्यावर शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली.१९ जुलै २०१३ रोजी संपूर्र्ण सेलू तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले होते. यात अनेक शेतकऱ्यांची शेती पुरामुळे खरडून गेली. यात येथील शेतकरी रमेश कोपरकर यांचीही कपाशीची शेती नाल्याच्या पुरामुळे खरडून निघाली होती. यात या शेतकऱ्याचे दोन एकरापेक्षा अधिक शेती खरडून निघाली. अतिवृष्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येथील पदभार असलेले कृषी सेवक प्रत्यक्ष मोक्का पाहणीसाठी आले़ तलाठ्याकडूनही पंचनामा करण्यात आला़ यामुळे कोपरकर यांना शासकीय मदत मिळेल, अशी अपेक्षा होती; पण शासकीय मदतप्राप्त शेतकऱ्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा उल्लेखच नव्हता़ यामुळे शेतकऱ्याला धक्काच बसला़ याबाबत कृषी सेवक रिंधे यांना विचारणा केली असता त्यांनी कोपरकर यांचे नाव अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत नोंदविले नसल्याचे मान्य केले़ दोन महिन्यांपूर्वी पुन्हा कोपरकर यांना शासकीय मदत मिळावी म्हणून नाव देण्यात आले; पण यास विलंब झाल्याने त्यांना नुकसान भरपाई नामंजुर करण्यात आली. कृषी सेवकांच्या गलथान कारभारामुळे रमेश कोपरकर अतिवृष्टी पिडीत असताना शासकीय मदतीपासून वंचित राहिलेत़ सदर शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे़(वार्ताहर)