शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन ग्रीन’ संकल्पनेला लागले ग्रहण

By admin | Updated: June 29, 2017 00:35 IST

ग्रीन बेल्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले होते.

खड्ड्यांमध्ये केवळ काड्याच : संरक्षक कठडे बेपत्ता, जिवंत रोपे नगण्य लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : ग्रीन बेल्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले होते. या वृक्षांचे संगोपन होणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. परिणामी, खड्ड्यांमध्ये रोपांच्या नावावर केवळ काड्याच शिल्लक आहेत. शिवाय संरक्षक कठडेही बेपत्ता झाले आहेत. यामुळे ‘मिशन ग्रीन’ संकल्पनेचाच फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नांचे तीनतेरा वाजले आहे. वृक्षांचे अनेक संरक्षक कठडे मोठ्या प्रमाणात तुटले आहेत. त्यातील बरीच रोपे मृतप्राय अवस्थेत आहे. काही ठिकाणी केवळ खड्डे तर काही ठिकाणी काड्याच शिल्लक आहेत. जिवंत रोपाची संख्या रोडावली असून ५० ते ६० संरक्षक कठडेच आता व्यवस्थित असल्याचे निदर्शनास येते. यामुळे ‘मिशन ग्रीन’ संकल्पनेला ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर हिंगणघाट ते वडनेर दरम्यान दुतर्फा वृक्षारोपण करून हिरवा पट्टा निर्माण करण्याची शासकीय योजना तयार करण्यात आली होती. त्यानुसार महामार्गाला हिरवेगार करण्याच्या प्रयत्नांत १० हजार वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावून त्यांचे संगोपन, संवर्धन करण्याचे काम निवीदा काढत कंत्राटदाराकडून करून घेण्यात आले. बांबूपासून बनविलेले संरक्षक कठडे रोपांना लावण्यात आले; पण काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने अनेक कठड्यांनी आपली जागाच बदलली आहे. अनेक कठडे तर तत्पूर्वीच तुटले असून वृक्षांना संरक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या कठड्यांचीच स्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे ते वृक्ष संगोपन, संरक्षण करतील काय, हा प्रश्नच आहे. तुटलेल्या कठड्यांमुळे वृक्षसंगोपनात आणखी अडचणी वाढल्या आहे. अनेक वृक्षांची पूढे वाढ होऊ शकली नाही. अनेक रोपे गुरांनी फस्त केले आहेत. शिवाय कोमेजलेल्या रोपांची संख्याही मोठी आहे. रोपांसाठी केलेल्या खड्ड्यांमध्ये आता केवळ काड्याच शिल्लक असल्याचे दिसते. दहा किमीच्या हरित पट्ट्यातील सुमारे ३० वृक्षांवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे शासनाचा निधी व्यर्थ तर जात नाही नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरवर्षी शासनाद्वारे वृक्षारोपणावर भर दिला जातो; पण वृक्ष जगण्याचे अत्यल्प असल्याने खर्च व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येते. शासनाच्या उद्देशालाच तिलांजली राष्ट्रीय महामार्ग, महामार्ग, राज्य मार्ग, ग्रामीण रस्ते अशा बऱ्याच प्रकारच्या रस्त्यांची निर्मिती सर्वत्र होत आहे. यात सर्वत्र डांबर आणि सिमेंटचे जंगल पसरत आहे. परिणामी, पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ग्रीन बेल्ट तयार करण्याच्या उद्देशाने शासनाने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली. यात रोपांची लागवड करण्यात येते; पण वृक्षांचे संवर्धन होत नसल्याने मूळ उद्देशाला तिलांजलीच मिळत आहे.