शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कारयात्रेतून ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:27 IST

सडक सुरक्षा, जीवन रक्षा हा संदेश देणारी दिल्लीच्या राजघाट येथून निघालेली कार यात्रा रविवारी पूणे होत रात्री उशीरा सेवाग्राम येथे दाखल झाली. सोमवारी सकाळी या कार यात्रेतील सहभागी मान्यवरांनी येथील गांधी आश्रमाची पाहणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी ही कार रॅली यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली.

ठळक मुद्देबापूकुटीत राष्ट्रपित्याला अभिवादन : बापूंच्या १५० व्या जयंतीनिमित्त दिल्ली ते बांगलादेश प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सडक सुरक्षा, जीवन रक्षा हा संदेश देणारी दिल्लीच्या राजघाट येथून निघालेली कार यात्रा रविवारी पूणे होत रात्री उशीरा सेवाग्राम येथे दाखल झाली. सोमवारी सकाळी या कार यात्रेतील सहभागी मान्यवरांनी येथील गांधी आश्रमाची पाहणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी ही कार रॅली यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून ही विशेष कार यात्रा काढण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पूणे येथून ही कार यात्रा वर्धेत रविवारी उशीरा दाखल झाली. यात्रेकरूंनी सोमवारी सकाळी बापूकूटीत नतमस्तक होऊन राष्ट्रपित्याला अभिवादन केले. त्यानंतर ही कार यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली. भारत सरकारच्या पुढाकाराने कलिंगा मोटर स्पोर्टस् क्लब भुवनेश्वर उडिसा यांच्या सहकार्याने ही कार यात्रा आयोजित करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने यात्रेकरू नागरिकांना ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’चा संदेश देत आहेत.आठ महिलांचा समावेशया कार यात्रेत वेगवेळ्या विभागाचे लोक व नागरिक सहभागी झाले आहेत. इतकेच नव्हे तर आठ महिलांसह २२ पुरुषांचा त्यात समावेश असून गांधीजींचे सचिव म्हणून काम केलेले ९७ वर्षीय व्ही. लल्यानम् ही दिल्ली ते पुणेपर्यंत यात्रेत सहभागी झाले होते.वाहतूक नियमांचे पटवून देत आहेत महत्त्वरस्ता सुरक्षा सप्ताह अभियाना अंतर्गत ही यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेची सुरूवात दिल्लीच्या राजघाट येथून झाली असून यात्रेतील सहभागी मान्यवर नागरिकांना वाहन चालविताना वाहतूक नियम पाळणे कसे फायद्याचे ठरते हे पटवून देत आहेत. शिवाय जीव लाखमोलाचा आहे, याचे भान ठेऊन वाहनचालकांनी वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, हेही ते पटवून देत आहेत.३,००० कि.मी. प्रवास पूर्णदिल्ली ते सेवाग्राम असा तीन हजार कि़मी.चा प्रवास या यात्रेकरूंनी आतापर्यंत पूर्ण केला आहे. सोमवारी ही यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली असून ती मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, ऊत्तराखंड, बंगाल होत बांग्लादेश येथे जाणार आहे. त्यानंतर आगरा, म्यानमार येथे पोहोचेल. २५ फेबु्रवारीला या कार यात्रेचा समारोप होणार आहे.भारत सरकारच्या अभियान अंतर्गत ही यात्रा आहे. सडक सुरक्षा जनजागृती आणि गांधीजींचा विचारांचा प्रचार करण्याचे काम या अभियानातून आम्ही करीत आहो. ही कार यात्रा ७,२५० कि.मी.ची असून सर्वत्र च़ागला प्रतिसाद मिळत आहे.- लाजप्रत प्रसाद, यात्रेतील सहभागी सदस्य.