शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

भटक्या जमातीच्या वस्तीत घरीच होतात प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:06 IST

आरोग्य सेवा गावोगावी पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे.

प्रथा, परंपरांचा पगडा कायमच : भटकंती दरम्यान स्थिरावलेला समाज शासनाच्या सेवांपासून वंचित अरविंद काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : आरोग्य सेवा गावोगावी पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. असे असताना केवळ प्रथा परंपरा आणि समाजाच्या बंधनात रखडलेल्या भटक्या समाजातील गर्भवतींची प्रसूती घरीच होत असल्याचे समोर येत आहे. रानोमाळ भटकंतीचे जीवन जगणारा पारधी, गोसावी व बेलदार समाज कालांतराने स्थिरावला. तरीही शिक्षणाचा अभाव, अज्ञान, अंधश्रध्दा या पगड्यातून बाहेर यायला तयार नसल्याने आरोग्य विभागाच्या योजनांचा येथे लाभ होत नसल्याचे दिसून आले आहे. आकोली व म्हसाळानजीक गोसावी समाजाची मोठी वस्ती आहे. जामनी व मदनी गावात भटकंती करीत स्थिरावलेला समाज वास्तव्यास आहे. या समाजात घरीच बाळंतपण करण्याची प्रथा रुढ आहे. या तांड्यांपर्यंत आरोग्य सेवेची जनाजागृती गेली नाही असेच म्हणावे गावखेड्यात आरोग्य उपकेंद्र आली, आशा मदतीला आहे, काही अंशी अंगणवाडी सेविका, मदतनीसही आरोग्य विभागाच्या हातात हात घालून काम करताना दिसते. एवढी सर्व यंत्रणा असताना भटक्या जमातीत आरोग्य विषयक प्रबोधन होवू नये, याचे नवल वाटते. समुपदेशनाचाही उपयोग नाही या समाजावर मंत्र-तंत्राचा पगडा अद्यापही कायम आहे. परिचारिका उपकेंद्रात बाळतपण करावे, यासाठी प्रयत्नशीलच नाही तर मनधरणी करतात; पण येथील महिला घरी बाळंतपण करणे पसंत करतात. यात कधी बाळ दगावण्याच्या घटनाही घडतात; पण त्याची कुठे नोंद होत नाही. घरात दुरदर्शन आले. त्या समाजाची मुले शाळेत जायला लागली. लोकजागृती, प्रबोधन, प्रचार आणि प्रसारात आरोग्य यंत्रणा कुठे तरी मागे पडली आहे. बदल घडवायचा असेल तर आरोग्य यंत्रणेने केवळ बाळंतपणात संपर्क साधून होणार नाही तर सतत त्यांच्याशी चर्चा करून, मार्गदर्शनाची गरज आहे. काही प्रकरणात मी स्वत: गरोदर माता व कुटुंबीयांशी दवाखान्यात बाळंतपण करण्याबाबत बोलतो, पण त्यांची ऐकण्याची मनस्थिती नाही. घरी बाळंतपण केल्याने कशाप्रकारे धोका होवू शकतो हे पटवून सांगितले तरी ते घरीच बाळंतपण करतात. एक मान्य करावे लागेल की त्या समाजात जनजागृती करायला कुठे तरी मागे पडलो की, काय असे वाटते. - डॉ. रविंद्र देवगडे, वैद्यकीय अधिकारी, झडशी.