शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात अपहरण करुन ७ वर्षीय चिमुरडीवर सामुहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:34 IST

सात वर्षीय चिमुरडीचे घरातून अपहरण करुन एका निर्जनस्थळी नेत तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी घडली.

ठळक मुद्देएक आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सात वर्षीय चिमुरडीचे घरातून अपहरण करुन एका निर्जनस्थळी नेत तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. तब्बल दोन दिवसांनंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने अखेर पुलगाव पोलिसात तीन नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

पुलगाव पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, इंझाळा येथील विनोद वरभे याचे पीडितेच्या घरी नेहमी येणेजाणे होते. पीडितेच्या कुटुंबियाशी परिचय असल्याने त्याला घरातील सर्व सदस्य ओळखत होते. ६ ऑगस्ट रोजी पीडित चिमुरडी आपल्या आई वडिलांसह घरी झोपून असताना विनोद वरभे याने पीडितेच्या घरात प्रवेश करीत तिचे अपहरण केले. तिचे तोंड दाबून तिला लगतच्या एका नर्सरीत नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. इतकेच नव्हे तर त्याच्यासोबत असलेल्या दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. गंभीर अवस्थेत पीडितेला तिच्या घरासमोर फेकून देण्यात आले. पीडितेला काहीही समजत नव्हते तिला त्रास होवू लागल्याने ती रडत बसली होती.

पीडितेच्या आईला रडण्याचा आवाज आल्याने बाहेर येऊन पाहिले असता गंभीर अवस्थेत मुलगी दिसून आल्याने आईच्या पाया खालची वाळूच सरकली. बदनामी खातर ही बाब पीडितेच्या आईने कुणालाही सांगितली नाही. एका सामाजिक संस्थेला याची माहिती मिळाली असता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडितेच्या घरी जात पीडितेचे व तिच्या कुटुंबाचे समुपदेशन केले. अखेर पीडितेने तक्रार देण्याचे ठरवले. त्यानुसार शनिवारी पीडितेने पुलगाव ठाण्यात अत्याचाराची तक्रार दाखल केली असून तक्रारीत तिघांनी अत्याचार केल्याचे बयाण दिल्याने पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विनोद वरभे यास अटक केली असून अन्य दोघांचा शोध पुलगाव पोलीस घेत आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार