शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

वन्यजीव संवर्धनातून रोजगाराच्या अनेक संधी

By admin | Updated: April 23, 2016 02:13 IST

देशात सर्वात लहान व्याघ्र संवर्धन प्रकल्प हा बोर आहे. या अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात १२० स्क्वेअर कि़मी. वरून दुप्पट वाढ होण्याची संधी आहे.

किशोर रिठे : बोर व्याघ्र प्रकल्पात राष्ट्रीय जनसंपर्क परिषदवर्धा : देशात सर्वात लहान व्याघ्र संवर्धन प्रकल्प हा बोर आहे. या अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात १२० स्क्वेअर कि़मी. वरून दुप्पट वाढ होण्याची संधी आहे. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या ४४ गावांसमोरील प्रश्न दूर होण्यासाठी मदतच होणार आहे. तसेच वन्य जीव संवर्धनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मत मत वन्यजीव अभ्यासह किशोर रिठे यांनी व्यक्त केले. पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडिया वर्धा चॅप्टरच्यावतीने राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेचे आयोजन बोर व्याघ्र प्रकल्प संकुलात गुरुवारी करण्यात आले होते. ‘एक राष्ट्र एक स्वर विश्वासाचा सेतू जनसंपर्क’ या विषयावर आधारित या परिषदेत ‘वन पर्यटन आणि जनसंपर्क’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी ‘बोर’ चे विभागीय वनाधिकारी एस.बी. भलावी, प्रकल्पाचे सहायक वनरक्षक उत्तम सावंत, वन परिक्षेत्र अधिकारी रूपाली भिंगारे-सावंत, चॅप्टरचे अध्यक्ष प्रा. अनिल कुमार राय, मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लिलाधर बन्सोड, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे विनेश काकडे आदींची उपस्थित होती. प्रा. अनिल कुमार राय यांनी ‘एक राष्ट्र एक स्वर : विश्वासाचा सेतू जनसंपर्क’ यावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी जनसंपर्काचे महत्व, जनसंपर्क संघटनेची स्थापना, मॅकब्राईड आयोग आदी विषयांतून देशात एकता टिकविण्यासाठी सामुहिक जबाबदारी सर्वांवर असल्याचे सांगितले. देशात विविधतेत एकता असून एक राष्ट्र, एक स्वर हीच आपली शक्ती असल्याचे स्पष्ट केले.भलावी यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती देऊन येथील आजूबाजूंच्या गावांच्या सहकार्यातूनच विकास साध्य होणार असल्याचे सांगितले. प्रकल्पाच्या आजूबाजंूच्या गावांमध्ये ९५ टक्के एलपीजी गॅसची जोडणी देऊन होणारी वृक्ष कत्तल, चुलीपासून होणारे प्रदूषण, त्यापासून होणारा आजार यावर नियंत्रण होण्यास मदत झाली असल्याचे सांगितले. बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटनात दिवसेंदिवस वाढ होत असून गावकऱ्यांनी पर्यटन विकासात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जनसंपर्क क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बनसोड, नांदूरकर यांचा सत्कार करण्यात आला. संमेलनात उपस्थितांना द्वितीय व तृतीय सत्रात सावंत आणि काकडे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी रातवा या वन्य संवर्धनावर आधारित संकेतस्थळाचे आणि परिषदेच्या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी पीआरएसआय वर्धा चॅप्टरचे सचिव बी.एस. मिरगे, संजय इंगळे तिगावकर, संदीप घनोकार, इब्राहिम बक्ष, रोश लेहकपुरे, श्याम टरके, सचिन घोडे, प्रा. राजेंद्र मुढे, नंदकुमार वानखेडे, प्रवीण गावंडे, अभिजित बोडखे, आदींसह हिंदी विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)नवमाध्यमांचा वापर करावा - अनिल गडेकरसमारोपीय सत्रात जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर म्हणाले, नवमाध्यमांचा वापर प्रभावीपणे शासनाच्या जनसंपर्क विभागामार्फत करण्यात येत आहे. जनसंपर्क अधिकारी यांनीही काळाची गरज ओळखून फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करणे गरज बनल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, यशवंत दाते स्मृती संस्थेचे प्रदीप दाते, पक्षी अभ्यासक किशोर वानखडे यांचीही उपस्थिती होती. सहभागींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.