शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

म. प्र. पोलिसांना हवा असलेला कुख्यात घरफोड्या अटकेत

By admin | Updated: March 3, 2017 01:43 IST

मध्यप्रदेश पोलिसांना आवश्यक असलेला अट्टल घरफोड्या चरणसिंग गब्बुसिंग भादा याला सावंगी (मेघे) पोलिसांनी दुचाकी चोरीत अटक केली आहे.

सावंगीसह वर्धा व चंद्रपूर येथे गुन्हे वर्धा : मध्यप्रदेश पोलिसांना आवश्यक असलेला अट्टल घरफोड्या चरणसिंग गब्बुसिंग भादा याला सावंगी (मेघे) पोलिसांनी दुचाकी चोरीत अटक केली आहे. त्याने सावंगीसह वर्धा, चंद्रपूर आणि पांढुर्णा येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. सावंगीच्या गुन्ह्यानंतर त्याला वर्धा पोलीस ताब्यात घेण्यात असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. पोलीस सुत्रानुसार, सावंगी पोलिसांची चमू रात्रगस्तीवर असताना त्यांना एका सुनसान मंदिरात काही इसम अंधाराचा फायदा घेत लपून असल्याचे दिसून आले. यावरून सदर इसमांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी अनेक चोऱ्यांची कबुली दिली. शिवाय सावंगी येथे दुचाकी चारीची कबुली दिली. सावंगी ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याच्याकडे मध्य प्रदेशातील एक दुचाकीही जप्त आढळून आली आहे. पोलिसांनी चरणसिंग भादा रा. पांढुर्णा याच्यासह गणेश सिंग रा. मोर्शी रा. अमरावती हा यालाही अटक केली आहे. या दोघांनी वर्धा शहरात दोन, सावंगी दोन, चंद्रपूर दोन आणि पांढुर्णा येथील तीन घरफोड्या कबुल केल्या आहेत. चरणसिंग भादा हा कुख्यात घरफोड्या असल्याची माहिती पोलिसांना कारवाईदरम्यान मिळाली. त्याच्या अटकेची माहिती मिळताच वर्धेसह, चंद्रपूर व पांढुर्णा पोलिसांनी त्याची मागणी केली आहे. प्रारंभी वर्धा पोलिसांनी त्याची मागणी केल्याची माहिती आहे. ही कारवाई सावंगी ठाणेदार संतोष शेगावकरसह सहायक पोलीस उपनिरीक्षक बीसने, प्रदीप राऊत, सघर्षसेन कांबळे, विलास अवचट यांनी केली.(प्रतिनिधी) एमपीत चोरी करून सावंगीच्या बेड्यावर आश्रय चरणसिंग भादा हा मध्यप्रदेशातील कुख्यात चोर आहे. तिथे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येथे चोऱ्या करून तो सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिकलकरी बेड्यावर आश्रयाला येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार गत अनेक वर्षांपासून सुरू आहे. मध्यप्रदेशात चोऱ्या करून वर्धेलगतच्या बेड्यांवर लपणारे अनेक आरोपी असल्याची माहिती आहे.