शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर हल्ला करणारा दारूविक्रेता स्थानबद्ध

By admin | Updated: September 15, 2016 00:57 IST

पोलिसांवर सातत्याने होणारे हल्ले, हा मुद्दा राज्यस्तरावर गाजत आहे. वर्धा शहरातील दारूविक्रेत्यानेही एकदा नव्हे तर चारवेळा पोलिसांवर हल्ले केले.

आदेश पारित : दारू विक्री व वाहतुकीचे अनेक गुन्हे दाखलवर्धा : पोलिसांवर सातत्याने होणारे हल्ले, हा मुद्दा राज्यस्तरावर गाजत आहे. वर्धा शहरातील दारूविक्रेत्यानेही एकदा नव्हे तर चारवेळा पोलिसांवर हल्ले केले. या दारूविक्रेत्याविरूद्ध स्थानबद्धतेचा आदेश पारित करण्यात आला आहे. ही कारवाई एमपीडीए अ‍ॅक्टनुसार बुधवारी करण्यात आली. सराईत गुन्हेगार व दारूविक्रेता राजेश उर्फ राजू उर्फ अंडा जगलाल जयस्वाल (४२) रा. नालवाडी हा वर्धा शहर, हिंगणघाट, देवळी, दहेगाव, समुद्रपूर व सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध दारूची विक्री व वाहतूक करीत होता. तो हातभट्टीवाला व धोकादायक व्यक्ती सदराखाली मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे याबाबत अधिनियम १९८१ सुधारीत २००९ अन्वये स्थानबद्धतेकरिता प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हा दंडाधिकारी यांना सादर केला होता. यावर सोमवारी आदेश पारित करण्यात आला. आदेशानुसार राजेश उर्फ राजू उर्फ अंडा जगलाल जयस्वाल (४२) यास झोपडपट्टीदादा हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे अधिनियम १९८१ सुधारीत २००९ च्या कलम ३ पोटकलम १ अन्वये एक वर्षाकरिता जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या युद्ध स्तरावर मोहीम राबवित त्याचा शोध घेतला. त्याला वर्धा शहर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात एमपीडीए अ‍ॅक्ट अन्वये जिल्हा दंडाधिकारी यांचा प्राप्त स्थानबद्धता आदेश मराठी व इंग्रजीमध्ये संपूर्ण कागदपत्रांसह तामील केला गेला.ेजिल्ह्यात दारूबंदी असल्याने अवैध दारूविक्रेत्यांच्या व्यवसायावर आळा घालण्यास्तव प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करून पोलिसांनी कठोर कार्यवाही करण्यास सुरूवात केली आहे. अवैध व्यावसायिकांवर यापूढेही एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याची कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे, अचल मलकापुरे, एस.बी. कडू, वर्धा पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)