समुद्रपूर : जिल्ह्यात प्रसिद्ध येथील बैलबाजारातून हैदराबाद येथील कत्तलखान्याचे व्यापारी दलालाच्या माध्यमातून शेतीपयोगी व तरूण गोऱ्हे, गायी, म्हशींची सर्रास खरेदी करून कत्तलखान्यात पाठवितात़ यामुळे परिसरातील पशुधन संपुष्टात येण्याची भीती वर्तविली जात आहे. परिसरातील शेतकऱ्यांना गुरे राखणे व वैरणाची सोय नसल्याने खर्च झेपत नाही़ यामुळे तालुक्यातील शेतकरी आपली जनावरे बैल बाजारात आणतात़ कसायाव्यतिरिक व्यापारी खरेदीदार राहत नसल्याने नाईलाज म्हणून कवडीमोल भावात ती विकतात़ यामुळे भविष्यात गावराण गायी, बैल संपुष्टात आल्यास पुढील पिढीला चित्रातूनच गावराण गाय दाखवावी लागेल, असे चित्र आहे़१९९४ मध्ये प्रीतीसुधा यांचे समुद्रपूरला आगमन झाले होते. त्यांनी गोमातेचे महत्त्व प्रवचनातून विषद केल्यानंतर प्रेरणा घेत पांडुरंग उजवणे, दिवंगत डॉ. सुधीर खेडूलकर व सहकाऱ्यांनी बाजारातून जनावरे कसायाला विकू नका, असे आवाहन केले होते़ यामुळे पाच वर्षे हा प्रकार बंद होता; पण तो पुन्हा सुरू झाला. समीर कुणावार व आश्रम दात्याच्या सहकार्याने महादेव चौधरी, दिवंगत तोताराम वानकर यांनी पुढाकार घेत गोरक्षण संस्था स्थापन केली. त्यात शेतकरी गायी कसायाला न विकता गौरक्षण संस्थेला देत होते़ ही संस्था तीन वर्षे चांगल्या प्रकारे चालली़ पूढे उत्पन्न शुन्य, वैरण खर्च, गुरे चारण्याची मजुरी वाढली. आश्रमदात्यांनी आर्थिक मदत बंद केल्याने ही संस्था कायमस्वरूपी बंद पडली़ यामुळे नष्ट होणारा गोवंश वाचविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे़जिल्ह्यातील पशुधन संकटात आले आहे. समुद्रपूर मार्गे आंध्र प्रदेशात जनावरांची तस्करी होत आहे. वैरण टंचाईमुळे पशुधन विक्रीस काढल्या जात असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देत चाराप्रश्न सोडविल्यास जनावरांना कत्तलखान्याकडे नेण्यापासून वाचविले जाऊ शकत असल्याचे बोलल्या जात आहे.(तालुका प्रतिनिधी)
पशुधन चालले कत्तलखान्याकडे
By admin | Updated: January 25, 2015 23:21 IST