शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

तीन दिवसांपासून लिंक फेल

By admin | Updated: May 16, 2015 02:16 IST

सतत तीन दिवसांपासून पवनार येथे सेंट्रल बँक आॅफ इंडियाची लिंक फेल असल्याने पवनार येथील नागरिकांचे व्यवहार ठप्प झाले होते. चौथ्या दिवशीही सेवा सुरळीत न झाल्याने ...

वर्धा : सतत तीन दिवसांपासून पवनार येथे सेंट्रल बँक आॅफ इंडियाची लिंक फेल असल्याने पवनार येथील नागरिकांचे व्यवहार ठप्प झाले होते. चौथ्या दिवशीही सेवा सुरळीत न झाल्याने नागरिकांची कामे खोळंबली होती. शुक्रवारी सायंकाळी लिंक सुरळीत झाल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले. बीएसएनएलच्या कुचकामी सेवेचा फटका नागरिकांना बसत असल्याचे बोलल्या जात आहे. पवनार येथे नागरिकांना बँकेची सेवा देण्यासाठी सेंट्रल बँक आॅफ इंडियाची शाखा सुरू करण्यात आली. मोठ्या प्रमाणात स्थानिकांचे तसेच परिसरातील गावांमध्ये नागरिकांचे व्यवहार या बँकेमार्फत चालतात. राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा असल्याने नागरिकांनाही या बँकेशिवाय पर्याय नसतो. सध्या शेती कामाची व लग्नसराईची धूम असल्याने पैसे काढण्यासाठी तसेच टाकण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी असते. रोखीचे व्यवहार थोडे कमी झाल्याने नागरिक जास्त पैसा हाताशी न ठेवता तो बँकेत जमा करीत असतात. परंतु गत तीन दिवसांपासून येथील बीएसएनएलच्या सेवेत तांत्रिक बिघाड आल्याने येथील लिंक फेल झाली आहे. चौथ्या दिवशीही लिंक फेलच असल्याने ग्राहकांचे व्यवहार ठप्प झाले होते. सोबतच बीएसएनएलची दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्याला तात्काळ पैसे काढायचे असल्यास त्याला येथून विड्रॉल भरून वर्धा येथे मुख्य शाखेत जावून पैसे काढावे लागतात. तसेच जमा झालेले दिवसभरातील नागरिंकांचे विड्रॉल बँकेतील एखादा कर्मचारी वर्धा मुख्य कार्यालयात जावून वटवून आणत होता. या सर्व गैरव्यवस्थेमुळे येथील बँकेचे ग्राहक त्रस्त झाले होते. चौथ्या दिवशीही व्यवहार ठप्पच होते. हा प्रकार नित्याचाच झाल्याचे ग्राहक सांगतात. बँकेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने त्रास शेवटी नागरिकांनाच होतो. दुपारनंतर सेवा सुरळीत केल्याचे बीएसएनएलकडून सांगण्यात आले. परंतु सायंकाळनंतर लिंक सुरळीत झाल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले. विस्कळीत होणारी इंटरनेट सेवेचा फटका ग्राहकांना सोसावा लागत आहे.(शहर प्रतिनिधी)