शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची दहशत; आठ दिवसांत आठ शिकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 05:00 IST

झडशी शिवारातील चारगाव व बोरखेडी तसेच परिसरातील शेतशिवारात तब्बल चार वर्षांपासून बिबट वास्तव्य करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेकदा तर शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शनही झाले. बिबट मानवावर हल्ला करीत नाही या समजुतीने आतापर्यंत शेतकऱ्यांनी मनावर घेतले नाही. मात्र, आता जनावरांवरील हल्ल्यांत वाढ झाल्याने शेतकरी, शेतमजुरांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. याबाबत वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी चचपणी सुरू केली असून ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे पडताळणी करीत आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : परिसरातील चारगाव, बोरखेडी येथे मागील चार वर्षांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याने यावर्षी वाघाने चांगलाच कहर केला आहे. मागील आठ दिवसांत आठ जनावरांचा फडशा पाला असून मानवावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.  झडशी शिवारातील चारगाव व बोरखेडी तसेच परिसरातील शेतशिवारात तब्बल चार वर्षांपासून बिबट वास्तव्य करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेकदा तर शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शनही झाले. बिबट मानवावर हल्ला करीत नाही या समजुतीने आतापर्यंत शेतकऱ्यांनी मनावर घेतले नाही. मात्र, आता जनावरांवरील हल्ल्यांत वाढ झाल्याने शेतकरी, शेतमजुरांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. याबाबत वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी चचपणी सुरू केली असून ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे पडताळणी करीत आहे.  वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. आगाशे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक घनश्याम टाक, वनरक्षक  आर. डी. बहादुरे, पी. एस. आडे,  बी. बी. परबत, बी. के.  वैद्य, सुदाम मुगले, विठ्ठल उडान,  रामा उईके, शरद श्रीराम यांनी गस्त वाढविली आहे.  

आठवडाभरात पाच जनावरांचा पाडला फडशा-    बिबट्याने कैलास दरणे, भानुदास भगत, खुशाल भुजाडे, योगेश गडकरी, भाऊराव लिडबे या शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचा फडशा पाडला. याबाबत हिंगणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. आगाशे यांना विचारणा केली असता झडशी सह वनक्षेत्रात घडत असलेला बिबट्याचा वावर मी गंभीरतेने घेतला असून आजच वरिष्ठांशी चर्चा केली.  हा प्रकार मानवजातीस धोका होण्याची शक्यता असल्याने बिबट्यास जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :leopardबिबट्या