वायगाव (नि़) : तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या २२ वर्षीय विवाहितेने रात्री १२ वाजताच्या नंतर सर्व झोपेत असताना प्रियकरासोबत पळ काढला़ ही घटना सिरसगाव (ध.) येथे गुरूवारी घडली़ याबाबत पतीने पत्नी हरविली आहे, अशी तक्रार दिली़ किनगाव (बोथुडा) येथील १९ वर्षीय युवतीशी सिरसगाव (ध.) येथील युवकाचे २० मे २०११ रोजी लग्न झाले़ गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या संसारात ४ नोव्हेंबर २०१२ रोजी मुलाचा जन्म झाला. लग्न जुळल्यावर सदर युवती इयत्ता अकरावीचे शिक्षण घेत होती; पण तिच्या पतीने शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून वायगाव (नि.) येथी शाळेत प्रवेश मिळवून दिला़ शिवाय मोबाईलही दिला; पण त्या मोबाईलवर त्याच गावातील एका २० वर्षीय तरुणाचे मॅसेज येत असल्याचे दिसले़ यामुळे त्याने मोबाईल परत घेतला; पण विवाहितेने रात्री १२ वाजतानंतर सर्व झोपेत असल्याचे पाहून आपल्या दीड वर्षाच्या मुलाला सोडून गावातीलच युवकासोबत पलायन केले. सकाळी पत्नी दिसत नसल्याने कपाटाकडे लक्ष गेले असता बॅग, कपडे व पैसे घेऊन गेल्याचे दिसून आले़ या प्रकरणी पतीने पोलीस चौकीत धाव घेतली; पण पोलीस प्रशासन ही लक्ष देत नसल्याचे त्याने सांगितले. या घटनेमुळे गावात उलटसुलट चर्चेला उधान आले असून सदर युवक मात्र निराश झाला आहे़(वार्ताहर)
चिमुकल्याला सोडून मातेचे प्रियकरासोबत पलायन
By admin | Updated: August 14, 2014 00:01 IST