शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय सदनिकेला गळती

By admin | Updated: August 27, 2016 00:24 IST

शहरात दोन कोटी रूपये खर्चून पोलीस स्टेशन परिसरात दोन सदनिका निर्माण करण्यात आल्या

दोन वर्षांपूर्वीच झाले बांधकाम : बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्हकारंजा (घा.) : .शहरात दोन कोटी रूपये खर्चून पोलीस स्टेशन परिसरात दोन सदनिका निर्माण करण्यात आल्या यातील एक इमारत वर्षंभरापूर्वी पोलीस स्टेशनला हस्तांतरित करण्यात आली. पण या इमारतीमधील काही घरांमध्ये गळती सुरू झाली आहे. त्यामुळे सदनिकांच्या बांधकामाच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. या गळक्या वसाहतींची तात्काळ दुरूस्ती करावी याकरिता संबंधीत अभियंत्यांना लेखी तक्रारही ठाणेदार विनोद चौधरी यांनी केली. पण अद्यापही दुरूस्ती न करता टाळाटाळ होत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.पोलीस कर्मचारी व ठाणेदार यांच्या निवासाची सोय व्हावी म्हणून, कारंजा पोलीस स्टेशन परिसरात जवळपास दोन कोटी रूपये खर्चून दोन सदनिका बांधण्यात आल्या. यातील क्रं. १ च्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून ती पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आली. या इमारतीत एकूण १२ फ्लॅट्स आहेत. पोलीस कर्मचारी येथे वास्तव्यास गेलेले आहेत. या सदनिकेतील क्वॉर्टर ९ मध्ये पवन लव्हाळे हे कर्मचारी राहतात. त्यांच्या घरातील बेडरूम ही मोठ्या प्रमाणात गळत आहे. परिणामी लव्हाळे यांना नाईलाजाने पत्नीच्या बाळंतपणासाठी दुसरीकडे राहण्याची सोय करावी लागली. त्याचप्रमाण क्वॉर्टर क्रमांक २ मध्ये नीरज लोही नावाचे पोलीस कर्मचारी राहतात. या क्वॉर्टरमधील चे स्नानगृह व प्रसाधनगृहही गळत आहे. त्यामुळे दैनंदिन प्रात:विधी कसे करावे असा प्रश्न कार्मचारी वर्गाला पडला आहे. पाण्याच्या गळतीमुळे त्रस्त झालेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाणेदारांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार ठाणेदार चौधरी यांनी दोन महिन्यांपूर्वी संबंधीत अभियंत्याला लेखी पत्र देवून ठेकेदाराकडून त्वरीत दुरूस्ती करून द्यावी अशी विनंती केली. अद्यापही दुरूस्ती करण्यात आलेली नाही. तसेच बांधकाम परिसरात सर्वत्र साहित्य अस्ताव्यस्त पसरले असल्यामुळे इमारतीमध्ये ये-जा करतानाही अडचण जात आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये जाताना समोरच्या भागातील टिनाही गळतात. दुरूस्तीसाठी पत्र देऊनही सदर दुरूस्ती झालेली नाही.(तालुका प्रतिनिधी)