शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा उन्हाळ्यात घेतली जाणार बफरमधील पट्टेदार वाघांचीही नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:30 IST

देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. तब्बल १३८ चौरस किमीच्या या व्याघ्र प्रकल्पात सुमारे सहा प्रौढ वाघ, दहाहून अधिक बिबट, एक हजारहून अधिक हरण, १४ अस्वल, २८ रानकुत्रे, एक रानगव्हा, सांबर, नीलगाय, मोर आदी वन्यप्राणी व पक्षी आहेत. आतापर्यंत बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये वास्तव्यास असलेल्या वाघांची माहिती घेत त्यांना विशिष्ट क्रमांक दिला जात होता.

ठळक मुद्देवरिष्ठांच्या सूचनेवरून प्रादेशिकचे अधिकारी लावणार ट्रॅप कॅमेरे

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये वास्तव्य करणाऱ्या वाघांना विशिष्ट क्रमांक देत त्यांची नोंद व्याघ्र प्रकल्प प्रशासन घेते. परंतु, यंदाच्या वर्षी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक वाघाची नोंद घेत त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. तशा सूचना वन्यजीव विभागाकडून देण्यात आल्या असून वरिष्ठांच्या सूचनेवरूनच प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी यंदाच्या उन्हाळ्यात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून पट्टेदार वाघांबाबतची माहिती गोळा करणार आहेत. सर्वेक्षणाअंती ही माहिती पुढील कार्यवाहीसाठी बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाकडे वळती केली जाणार आहे.देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. तब्बल १३८ चौरस किमीच्या या व्याघ्र प्रकल्पात सुमारे सहा प्रौढ वाघ, दहाहून अधिक बिबट, एक हजारहून अधिक हरण, १४ अस्वल, २८ रानकुत्रे, एक रानगव्हा, सांबर, नीलगाय, मोर आदी वन्यप्राणी व पक्षी आहेत. आतापर्यंत बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये वास्तव्यास असलेल्या वाघांची माहिती घेत त्यांना विशिष्ट क्रमांक दिला जात होता. परंतु, यंदाच्या वर्षी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या प्रादेशिकच्या जंगलात नेमके किती वाघ आहेत याचीही माहिती घेतली जाणार आहे. तशा सूचना वन्यजीव विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वरिष्ठांच्या सूचनेवरून आता वर्धा जिल्ह्यातील खरांगणा, आर्वी, हिंगणी, कारंजा (घा.) तसेच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि कोंढाळी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यंदाच्या उन्हाळ्यात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून वाघांबाबातची माहिती गोळा करणार आहेत. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर सदरची माहिती पुढील कार्यवाहीसाठी बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाकडे वळती केली जाईल. 

आतापर्यंत व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वास्तव्य करणाऱ्या वाघांची माहिती घेवून त्यांना विशिष्ट क्रमांक दिला जात होता. परंतु, यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात  वन्यजीव विभागाकडून व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधीलही वाघांची माहिती गोळा करण्याबाबतच्या सूचना आहेत. या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून प्रादेशिकचे अधिकारी व कर्मचारी नक्कीच कार्यवाही करतील.- नीलेश गावंडे,वनपरिक्षेत्र अधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्प.

 

टॅग्स :Tigerवाघ