शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी नाका चौक नावापुरताच मोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2015 02:21 IST

शहरात ऐतिहासिक महत्त्व आणि अनेक बिकट प्रसंग अनुभवलेला चौक म्हणून पाच रस्त्यांच्या आर्वी नाका चौकाची ओळख आहे.

वर्धा : शहरात ऐतिहासिक महत्त्व आणि अनेक बिकट प्रसंग अनुभवलेला चौक म्हणून पाच रस्त्यांच्या आर्वी नाका चौकाची ओळख आहे. १९७३ पासून १९९२-९३ पर्यंत जकात कर नाका, पोलीस चौकी, प्रवासी निवारा व आता आर्वी नाका चौक अशी स्थित्यंतरे पार केलेल्या आर्वी नाक्याने जुनी ओळख हरवली आहे. सध्या हा विस्तीर्ण चौक अतिक्रमण, अव्यवस्था, नियोजनाचा अभाव आणि रहदारीच्या गर्दीत गुदमरत असल्याचे दिसते. या चौकाचे सौंदर्यीकरण कधी होणार, हा प्रश्नच आहे.शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून आर्वी नाक्याकडे पाहिले जाते. पूर्वी जकात कर वसूल केला जात असे. यासाठी म्हणून या चौकात नाका वसुलीसाठी छोटेखानी खोलीचे बांधकाम करण्यात आले होते. यातून जकात कर वसूल होत होता. १९९२-९३ मध्ये जकात कर वसुली बंद करण्यात आली. यामुळे ही खोली तशीच होती. १९९३-९४ मध्ये या चौकात पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली. जकात कर नाक्याच्या खोलीतूनच पोलीस चौकीचा कारभार चालविला जात होता. आर्वी नाका परिसरात पूर्वी शिख समाजाचे वास्तव्य होते. या चौकात चोरी, लुटमार, भांडणे नेहमीचीच झाली होती. यामुळे त्या काळी आर्वी नाका म्हटला की, कुणीही तिकडे जाण्यास धजावत नव्हते. शिवाय शहराची हद्दही संपत असल्याने तेथे पोलीस चौकी स्थापन करण्यात आली होती; पण पोलिसांचे तेथील वादांकडे लक्ष राहत नव्हते. यामुळे एक-दीड वर्षांतच चौकीही हटली. यानंतर २००१ ते २००३ या दरम्यानच्या काळात चौकात प्रवासी निवारा स्थापन करण्यात आला. सुमारे तीन-चार वर्षांच्या काळात म्हणजे २००५-०६ मध्ये तोही हटविण्यात आला. यानंतरही जकात कर नाल्याची खोली तशीच ठेवण्यात आली होती. २००३ नंतर या चौकाचे सौंदर्यीकरण व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याचा ठराव पालिकेकडून घेण्यात आला. आर्वी नाका चौकाचे नामकरण करण्याचेही ठरविण्यात आले; पण माशी कुठे शिंकली, हे कळण्यास मार्ग नाही. आजही आर्वी नाका चौकाचे भकास व मागासलेपण सामान्यांना खटकल्याशिवाय राहत नाही. नियोजनाचा अभाव असल्याने सध्या या चौकात अव्यवस्था असून शहराचा आत्माच हरवल्याचे चित्र आहे.