शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाकरिता लॅन्ड पुलिंग योजना

By admin | Updated: July 16, 2016 02:21 IST

नागपूर ही राज्याची उपराजधानी असून, देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, ...

शैलेश नवाल : ग्रामीण भागातील आर्थिक विकासाचा दर उंचावणार वर्धा : नागपूर ही राज्याची उपराजधानी असून, देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या महानगरामध्ये व लगतच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक व वाणिज्यक आस्थापना कार्यरत आहेत. नियोजित नागपूर, मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा वर्धेतील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातील काही गावांमधून जात आहे. यासाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा लँड पुलिंग योजनेंतर्गत भूधारकांसाठी भागीदारी देय व अनुज्ञेय लाभ भूधारकास मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविले आहे. नियोजित द्रुतगती मार्ग व त्यावरील नवनगरांच्या आखणीमध्ये अंतर्भूत जमीन विना संघर्ष व सत्वर प्राप्त होण्यासाठी नवी मुंबई, आंतरराष्ट्रीय विमानतळ व आंध्रप्रदेशाच्या अमरावती या नूतन राजधानी क्षेत्राच्या लँड पुलिंग योजनेंतर्गत देय व अनुज्ञेय लाभ विचारात घेऊन नियोजित नव नगरामध्ये भूधारकांना संपादित जमिनीच्या मोबदल्यात जिरायत जमिनीकरिता २५ टक्के व बागायत जमिनीकरिता ३० टक्के या प्रमाणात बिनशेती विकसित जमिनी भूखंड देण्यात येईल. त्यामुळे भूधारकांना या बिनशेती विकसित जमीन भूखंडावर त्या नव नगरांच्या विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय चटाई क्षेत्र निर्देशांकासह रहिवास वाणिज्यक वापर करता येईल. यामुळे नागरिकांनी अनेक फायदे होणार असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अधिनियम २०१३ प्रमाणे मोबदला भूधारकास विकसित बिनशेती भूखंड दिला जाणार आहे. या भूखंडाला १० वर्षानंतर त्यांच्या योग्य बाजारमुल्य भूधारकास प्राप्त होत नसेल तर त्या भूखंडासाठी आत्ताचा भूमी संपादक अधिनियम २०१३ प्रमाणे परिगणित भूधारकास मोबदला व त्यावर प्रतिवर्ष नऊ टक्के दराने सरळ व्याज दहा वर्षासाठी परिगणित करून देण्यात येत आहे. त्याच रकमेत असा भूखंड शासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र शासनाने प्रधिकृत केलेले प्राधिकरण पुन्हा खरेदी करेल. द्रुतगती मार्ग व त्यावरील नव नगरांच्या आखाणीमध्ये अंतभूर्त जिल्हे, तालुक्यातील जमिनी प्रामुख्याने जिरायत, वरकस हलक्या व कोरडवाहून स्वरूपाच्या आहे. काही जमिनी बागायती स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे भूधारकांना जमिनीचा ताबा शासनाकडे वार्षिक अनुज्ञेय अनुदान प्रती वर्षी पुढील १० वर्षांकरिता जिरायत जमिनीकरिता प्रती हेक्टर ५० हजार रुपये व बागायत जमिनीकरिता प्रती हेक्टरी एक लाख रुपये देण्यात येणार आहे.