शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

जिल्ह्यातून कोटंबा, बाजारवाडा ठरलेय सुंदर ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या सभागृहात महात्मा गांधी स्वच्छग्राम स्पर्धा, आर. आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धा आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिता विजय गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे, सरस्वती मडावी, माधव चंदनखेडे, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके यांची उपस्थिती होती. 

ठळक मुद्देदोन्ही ग्रामपंचायतींना मिळाला प्रत्येकी २० लाखांचा पुरस्कार : जिल्हा परिषदेच्या सभागृहात रंगलाय वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावातील स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक उर्जा, पर्यावरण, पादर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन स्मार्ट गाव बनविणाऱ्या ग्रामपंचायतींना आर.आर.पाटील (आबा) सुंदर ग्राम पुरस्काराने सन्मानित केले जाते. या स्पर्धेत तालुकास्तरावर बाजी मारुन जिल्हा स्तरावर पोहोचलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाखांचा पुरस्कार दिला जातो. २०१९-२० चा जिल्हास्तरीय आर. आर. पाटील (आबा) सुंदर ग्राम पुरस्कार सेलू तालुक्यातील कोटंबा आणि आर्वी तालुक्यातील बाजारवाडा ग्रामपंचायतीने पटकाविला असून दोन्ही ग्रामपंचायतीला २०-२० लाखांचा पुरस्कार विभागून देण्यात आला.जिल्हा परिषदेच्या सभागृहात महात्मा गांधी स्वच्छग्राम स्पर्धा, आर. आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धा आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिता विजय गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे, सरस्वती मडावी, माधव चंदनखेडे, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अविनाश गोहाड यांनी केले तर आभार सेलूचे सहायक गटविकास अधिकारी शालीग्राम पडघन यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्य उपस्थित होते. 

तालुकास्तरीय सुंदर ग्रामला मिळाला दहा लाखांचा पुरस्कारआर.आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीने भाग घेतला होता. यामध्ये तालुक्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना दहा लाखांचा पुरस्कार देण्यात आला. यात वर्धा तालुक्यातील महाकाळ, देवळीतील इंझाळा, समुद्रपुरातील पाठर, हिंगणघाटातील सावली (वाघ), आर्वीतील बाजारवाडा, सेलुतील कोटंबा, आष्टीतील नवीन आष्टी तर कारंजातील पांजरा (गोंडी) या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यातील जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाखांचा पुरस्कार आहे. याकरिता कोटंबा आणि बाजारवाडा या दोन्ही ग्रामपंचायती पात्र ठरल्यात.

जिल्हा स्वच्छ ग्राम स्पर्धेत रसुलाबाद ग्रामपंचायत प्रथमराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त यावर्षी महात्मा गांधी स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेकरिता प्रत्येक तालुक्यातील एक ग्रामपंचायत निवडण्यात आली असून त्या ग्रामपंचायतीला एक लाखाचा पुरस्कार देण्यात आला. यात तालुकास्तरावर आर्वी तालुक्यातील रसुलाबाद, आष्टीतील आनंदवाडी, देवळीतील कोळोणा (घोडे), हिंगणघाटमधील मुरपाड (मनोरा), कारंजातील पांजरा (गोंडी), सेलूतील धानोली (मेघे), समुद्रपुरातील पाठर आणि वर्धा तालुक्यातील महाकाळ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यापैकी रसुलाबाद ग्रामपंचायत ही जिल्ह्यातून प्रथम, आनंदवाडी द्वितीय तर महाकाळ ग्रामपंचायत तृतीय स्थानी आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख व दोन लाखांचा पुरस्कार देण्यात आला.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत