शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

काटोलकरला अटक करणारच!

By admin | Updated: October 12, 2015 02:20 IST

येथील जिल्हा परिषदेत झालेल्या कथित विशेष शिक्षक भरती प्रक्रीयेत भ्रष्टाचाराचा आरोप असलेला शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकरला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

ठाणेदारांची माहिती : शिक्षक पदभरती घोटाळा प्रकरणवर्धा : येथील जिल्हा परिषदेत झालेल्या कथित विशेष शिक्षक भरती प्रक्रीयेत भ्रष्टाचाराचा आरोप असलेला शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकरला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. यामुळे आता त्याला अटक होणे अटळ आहे. मात्र वर्धा शहर पोलिसांकडून त्याच्या अटकेसंदर्भात हयगय होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सदर प्रकरणात शहर पोलीस मॅनेज झाल्याची चर्चा जि.प.च्या आवारात जोर धरत आहे. मात्र काटोलकरला अटक करणारच असे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानात झालेल्या विशेष शिक्षक भरती प्रक्रीयेत शिक्षणाधिकाऱ्याने उत्तर पत्रिका बदलविल्याची तक्रार जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी शहर पोलिसात केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकरने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासंदर्भात अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली. तिथेही जामीन मिळणार नसल्याचे दिसून आल्याने त्याने गुरुवारी याचिका मागे घेतली. यामुळे आता काटोलकर याची अटक अटळ आहे.तपासाकरिता जिल्हा न्यायालयात त्याची याचिका रद्द करण्याची मागणी करणारे वर्धा पोलीस आता मात्र त्याच्या अटकेसंदर्भात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलीस काटोलकरच्या प्रकरणात मॅनेज झाल्याची चर्चा जि.प.च्या आवारात आहे. या संदर्भात शहर ठाण्याचे निरीक्षक बुराडे यांना विचारले असता त्यांनी सध्या शहरात नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त असल्यामुळे याकडे विशेष लक्ष नाही. अशातही थांगपत्ता लागताच त्याला अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले. काटोलकरला पोलीस केव्हा अटक करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)