शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

असुविधांत गुदमरतोय विद्यार्थ्यांचा जीव

By admin | Updated: August 11, 2016 00:29 IST

शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील विद्यार्थी गत तीन वर्षांपासून नरकयातना भोगत आहे.

शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रकार : दूषित पाणी पुरवठ्याने विद्यार्थ्याचा मृत्यू; लाईट, पंखे बंद सुरेंद्र डाफ आर्वी शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील विद्यार्थी गत तीन वर्षांपासून नरकयातना भोगत आहे. दूषित पाणी पिल्याने इलेक्ट्रॉनिक तृतीय वर्षाच्या शुभम देवासे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉक्टरांनी अहवाल देऊनही सुविधा पुरविण्यात कुचराई केली जात आहे. सदर वसतिगृहाला दिलेल्या प्रत्यक्ष भेटीत हा प्रकार उघड झाला. शासनाकडून अनुदान येत असताना असुविधांमुळे विद्यार्थी वसतिगृह सोडण्यास बाध्य होत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी कार्यवाही करणे अगत्याचे झाले आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या या वसतिगृहात शिक्षणासाठी बाहेर गावातील ६५ विद्यार्थी निवासी आहेत. असुविधांना कंटाळून यातील सात ते आठ विद्यार्थ्यांनी आजारी अवस्थेत वसतिगृह सोडले. मेकॅनिकल तृतीय वर्षाच्या मनीष शिंदे नामक विद्यार्थ्याला त्वजारोग जडला आहे. इतर विद्यार्थ्यांच्या अंगावरही दूषित पाणी पिल्याने पुरळ व चट्टे आल्याची धक्कादायक बाबही वसतिगृहाच्या भेटीत उघड झाली. विद्यार्थ्यांनीही असुविधांचा पाढा वाचला. आर्वी ते देऊरवाडा मार्गावर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. यात जवळपास १००० ते १५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांपूर्वी निवासी वसतिगृह बांधण्यात आले. या वसतिगृहात ६५ खोल्या आहे. पाच द्वितीय वर्षाचे तर ५० ते ५५ विद्यार्थी तृतीय वर्षाचे विद्यार्थी वसतिगृहात राहतात. महाविद्यालयाने वॉर्डनची नियुक्ती केली आहे; पण ते उपस्थित राहत नाही. सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळी देखरेख करतो. वसतिगृहाच्या खोल्या पावसाळ्यात गळतात. खोल्यांतील दिवे, पंखे नादुरूस्त आहेत. वसतिगृह महाविद्यालयाच्या मागील भागात असल्याने काळोख असतो. परिसरात गाजरगवत वाढले आहे. रस्त्यावर सांडपाणी साचलेले असते. परिणामी, रहदारीसाठी रस्ताच नाही. विद्यार्थ्यांना विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; पण त्या पाण्याची दुर्गंधी येते. विहिरीतील पाण्याचा एकदाही उपसा करण्यात आला नाही. १० ते २० कबुतरांनी विहिरीतच घरटे केले आहे. त्यांची विष्ठा पाण्यात पडते. जलशुद्धीकरण उपकरण आहे; पण तेही बंद आहे. महाविद्यालय प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. दूषित व घाण पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागत आहे. परिणामी, ५५ विद्यार्थ्यांना त्वचेच्या संसर्ग रोगाने ग्रासले आहे. पावसाळ्यात कबुतर विहिरीच्या पाण्यात पडून मरतात. परिसरात काळोख असतो. तंत्रनिकेतनचे प्राचार्य गुल्हाणे याची बदली झाली असून नवीन प्राचार्य आले; पण ते विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. वसतिगृह व महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू केलेला हा खेळ त्वरित थांबविणे तथा वसतिगृहात सर्व सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. काळोखातच खितपत जगताहेत विद्यार्थी वसतिगृहाची इमारत दुमजली असून पायऱ्या तसेच आत काळोख असतो. जेवनाच्या हॉलमध्ये १० लाईट लावण्यात आले आहेत; पण त्यापैकी केवळ एकच लाईट सुरू आहे. परिणामी, काळोखातच विद्यार्थ्यांना जेवण करावे लागते. इमारत परिसरातही व्यवस्थित प्रकाश व्यवस्था नाही. प्रसाधनगृहात लाईट नाही. विद्यार्थ्यांना काळोखातच खितपत जगावे लागत आहे. या स्थितीत ते अभ्यास कसा करणार, हा प्रश्नच आहे. वसतिगृहाच्या खिडक्यांची तावदाणे फुटली आहे. यामुळे रात्री किडे, डास शिरत असून आजारांचे प्रमाण वाढले आहे. कचरा टाकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य आहे. गवत वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रसाधनगृह, शौचालयात दुर्गंधीचे वातावरण आहे. १९ पैकी सहा शौचालय सुरू आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची कुचंबना होते. प्रसाधनगृहात नळाचीही व्यवस्था नाही.