शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कनिष्ठ महाविद्यालयांचा बायोमेट्रिक हजेरीला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:33 IST

कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत नाममात्र प्रवेश घ्यायचा व कोचिंग क्लासेसला नियमित उपस्थित रहायचे, अशा दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेतला; ......

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे दुर्लक्ष : संस्थाचालकांचं ‘चांगभलं’

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत नाममात्र प्रवेश घ्यायचा व कोचिंग क्लासेसला नियमित उपस्थित रहायचे, अशा दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेतला; पण दोन महिन्याच्या कालावधीनंतरही शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही कनिष्ठ महाविद्यालयांनी याची अंमलबजावनी केली नाही.कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान शाखेचे विद्यार्थी महाविद्यालयात नियमित उपस्थित न राहता, कोचिंग क्लासमध्ये नियमित उपस्थित राहतात. केवळ प्रात्याक्षिक परीक्षेसाठी महाविद्यालयात जाऊन ७५ टक्के हजेरी महाविद्यालयाकडून लावली जातात. परिणामी महाविद्यालयात न जाताही विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतो. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक्स पद्धतीने हजेरी सुरु करण्याचा निर्णय १५ जूनला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीने सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, अद्यापही ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली गेली नसल्याचे चित्र बघावयास मिळते.माध्यमिक शिक्षण विभाग कर्तव्यशून्यआदेश निर्गमित झाल्यापासून एक महिन्याच्या आत कनिष्ठ महाविद्यालयाने आवश्यक ती यंत्रसामुग्री स्वत: उपलब्ध करुन घ्यावी, असे शासनाचे आदेश आहेत. तसेच संबंधित माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, शिक्षण निरिक्षक यांनी कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रीक पद्धत सुरु करण्यात आली किंवा नाही याबाबत तपासणी करुन त्यासंदर्भातील अहवाल शासनास सादर करावा. महाविद्यालयांना आकस्मिक भेट देऊन बायोमेट्रीक उपस्थितीचा वेळोवेळी आढावा घ्यावा. असे आदेशित करण्यात आले आहे. परंतु, वर्ध्याच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अद्यापही याबाबत कुठलीही माहिती नाही. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात विचारपूस केली तर एकमेकांकडे बोट दाखविण्यातच येथील अधिकारी धन्यता मानतात.महाविद्यालयाची मान्यता काढणारजी कनिष्ठ महाविद्यालये बायोमेट्रीक उपस्थितीबाबत कार्यवाही करणार नाही. त्या महाविद्यालयाविरुद्ध मान्यता काढून घेण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमुद केलेले आहे. मात्र, शिक्षण विभागही हातावर हात देऊन असल्याने महाविद्यालयही सुस्तावलेले आहे. या प्रकारावरुन शिक्षण विभागाकडूनच महाविद्यालयांना संमती असल्याचे दिसून येत आहे.पहिल्या टप्प्यातच उडला बोजवाराही योजना टप्प्या-टप्प्याने कार्यन्वित करण्याचा निर्णय घेत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या पाच विभागातील सर्व विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पध्दतीने घ्यायचे निर्देश दिले होते. परंतू या पहिल्या टप्प्यातच या योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. त्यामुळे ही योजना कितपत यशस्वी होते हा प्रश्नच आहे.यंदाही शिकवणी वर्गांसोबत करारचकाही कनिष्ठ महाविद्यालयांसोबत माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे हितसंबंध जुळलेले असल्याने जिल्ह्यात अद्यापही ही योजना राबविल्या गेली नाही. त्यामुळे यावर्षीही काही महाविद्यालयांनी १० ते १५ हजार रुपये प्रती प्रवेशप्रमाणे करार केल्याचे चित्र आहे. इतकेच नाही एका महाविद्यालयात महाविद्यालयीन वेळेत चक्क शिकवणीवर्गच भरतात. त्यामुळे महाविद्यालय आहे की शिकवणीवर्ग असा प्रश्न निर्माण होतो. पालकही याला पसंती देत असल्याने धनदांडग्या पालकाच्या पाल्याचा हा अनधिकृत प्रकार शैक्षणिक भवितव्य धोक्यात घालणारा आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी