शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानशाही सरकारला मातीत घालण्याची वेळ आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:09 IST

शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचा शुभारंभ या पवित्र व पावनभूमीतून करण्याचा हेतू फार मोठा आहे.

ठळक मुद्देशंकर अण्णा धोंडगे : शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचा शुभारंभ या पवित्र व पावनभूमीतून करण्याचा हेतू फार मोठा आहे. गांधीजींनी मुठभर मीठ उचलून ब्रिटीश सत्येला आव्हान दिले. त्यावेळी काही लोकांनी बापूंवर टीका केली; पण तेच मूठभर मीठ उचलल्यामुळे देशात स्वातंत्र चळवळीचे वातावरण निर्माण झाले. शेतकºयांच्या आंदोलनासाठी हजारो कार्यकर्ते तुरंगात गेले. ते आज कुठे दिसत नाही; पण प्रत्येक शेतकºयांच्या मनात आग खदखदत आहे. सत्तेत येण्यापूर्वीच्या आश्वासनांचे विस्मरण सरकारला झाले असून सुलतानशाही सरकारला मातीत घालण्याची वेळ आली आहे, असे परखड मत शंकर अण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी आश्रमात किसान मंचच्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाला क्रांती दिनापासून सेवाग्राम ते नाशिक, अशी शुभारंभ सभा आयोजित होती. यावेळी माजी आमदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी वर्धेत निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती. आता सरकारने निराशा केली. कर्जमाफी दिली तरी सरकारला पुढच्या कर्जमाफीची तयारी करावी लागेल. यापेक्षा शेती उत्पादनालाच असा भाव द्यावा, की जेणेकरून तो फायद्यात राहील, अशा मागणीचा रेटा ठेवावा लागेल. किशोर माथनकर म्हणाले की, क्रांती दिनाला या अभियानाचा प्रारंभ गांधीजींच्या आश्रमातून होत आहे. ‘चले जाव’च्या नाºयाने देश पेटून उठला आता शेतकरी पेटून उठण्यासाठी ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाने व्हावे; पण विरोधाचा एल्गार दिसत नसल्याने आंदोलनाची पायाभरणी उद्दिष्ट पूर्तीने व्हावी.याप्रसंगी जयवंत मठकर, माजी आमदार वसंत कार्लेकर, दत्ता पवार, राजू राऊत, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, नितीन राऊत, खेमराज कौर, दिवाकर गमे आदींनपी मनोगत व्यक्त केले. सभेचे संचालन संजय काकडे यांनी केले तर आभार टी.सी. राऊत यांनी मानले. जि.प. सदस्य अशोक तेलंग, लक्ष्मीनारायण सोनोने, शशांक घोडमारे, प्रा. स्वप्नील देशमुख, कृउबास सभापती श्याम कार्लेकर, अविनाश काकडे, सुनील भोगे, हातिम बाबू, विलास पाखरे आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.सेवाग्राम, हिंगणघाट येथे रस्ता रोकोकिसान मंचचे शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान ५४ दिवसांचे असून २ आॅक्टोबर रोजी नाशिक येथे शेतकरी अधिवेशनाने समारोप होणार आहे. ३२ जिल्ह्यांत अभियानातून शेतकºयांशी चर्चा केली जाणार आहे. प्रारंभी बापूकुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना व भजन झाले. यानंतर किसान मंचच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सेवाग्राम आणि हिंगणघाट येथे प्रतिकात्मक रस्तारोको करीत अभियानातील विविध आंदोलनांचा परिचय दिला.