मनोहर पचारे : गटप्रवर्तकांचा मेळावावर्धा : आशा व गटप्रवर्तकांनी आपल्या न्याय हक्कासाठी संघटित होणे गरजेचे आहे. गावागावांत आरोग्य सेवेतील महत्वाचा दुवा म्हणजे आशा स्वयंसेविका म्हणून कार्य करतात. त्यामुळे शासनाने त्यांना सामाजिक सुरक्षा, जनश्री विमा योजना, किमान वेतन या मागण्या पूर्ण कराव्या. याकरिता आशा सेविका व गटप्रवर्तकांनी संघटित होवून लढा तीव्र करण्याची गरज मनोहर पचारे यावेळी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना, आयटक जिल्हा शाखेची विस्तारित सभा व मेळावा घेण्यात आला. योगिता डहाके यांच्या अध्यक्षतेखाली एम.एस.ई.बी. वर्कर्स फेडरेशन कार्यालय, बोरगांव (मेघे) येथे मेळावा पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश गोसावी, असलम पठाण, विजया पावडे, वंदना कोळणकर, मैना उईके यांची उपस्थिती होती. केंद्र व राज्य शासनाने संघटनेसोबत केलेल्या चर्चेप्रमाणे गटप्रवर्तक यांना २० हजार रुपये तर आशा सेविका यांना १० रू. देण्यात यावे. सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी. आशा व गटप्रवर्ततकांना शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग ३ व ४ रिक्त पदावर शासन सेवेत ३० टक्के जागा राखीव ठेवण्याचे आश्वासनाची पूर्तता करावी, गटप्रवर्तकांना वार्षिक प्रवास भत्ता १० हजार व आशा सेविकांना ६ हजार रू. देण्यात यावे. केंद्र शासनाने ३ जानेवारी २०१४ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे आशा कर्मचाऱ्यांना दरमहा मानधन देण्याची व्यवस्था करा, जननी सुरक्षा योजनेचा लाभ सर्व गरोदर मातांना द्यावा, त्यातील दारिद्रय रेषेची अट शिथील करावी, या कामाचा मोबदला आशा कर्मचाऱ्यांना मिळावा, मोबाईलचे बिल द्यावे, राष्ट्रीय आरोग्य विमा योजना व जनश्री विमा योजनेचा लाभ मिळावा यासह इत्यादी विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या सभेत आशा व गटप्रवर्तक यांचा मेळावा घेण्याबाबत चर्चा केली. तसेच २ सप्टेंबर २०१५ ला होत असलेल्या देशव्यापी संपात सहभागाबाबत माहिती दिली. यावेळी सुजाता भगत, चंदा गुल्हाणे, हर्षला डवरे, स्मिता म्हसे, वैशाली नंदरे यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
ंआशा व गटप्रवर्तकांनी न्याय हक्कासाठी संघटित होणे आवश्यक
By admin | Updated: August 27, 2015 02:20 IST