शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मुलीमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण ठरतेय चिंतेची बाब

By admin | Updated: June 19, 2014 00:12 IST

देशात किशोरवयीन मुलामुलींची संख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये असलेल्या रक्तक्षयाचे प्रमाण ५२ टक्के असल्याची बाब समोर

पिंपळखुटा : देशात किशोरवयीन मुलामुलींची संख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये असलेल्या रक्तक्षयाचे प्रमाण ५२ टक्के असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब चिंतेची असून भावी पिढी अधिक सुदृढ असण्याकरिता आरोग्य प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. यासोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे हा परिणाम असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मुले आणि मुली लवकरच वयात येत असल्याने त्यांना लैंगिक शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे़ या दृष्टीकोनातून शासनाच्या वतीने राज्यात किशोर किशोरीसाठी राबविण्यात येणाऱ्या संवाद आणि सेवा या केंद्राचे नाव बदलून ते आता राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम असे करण्यात आले आहे़शासनाच्यावतीने हा कार्यक्रम राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे़ १० ते १९ या वयोगटातील मुलामुलींची शारीरिक, लैंगिक आणि बौद्धिक वाढ होत असते़ मुलीमध्ये मासिक पाळी सुरू होते़ त्यामुळे या दोन्ही गटात भावनिक, मानसिक, वैचारिक बदल होत असतात़ यावेळी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठी पालक, शिक्षक किंवा नातेवाईक मोकळेपणाने त्यांना माहिती देवू शकत नाही़ अर्थातच त्यामुळे या वयात मुलामुलींमध्ये परस्परांप्रती शारीरिक आकर्षण निर्माण होते़ अनेकवेळा लैंगिक बाबतीत गैरसमजही निर्माण होतात़ त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते़ शासनाकडून होत असलेले प्रयत्न पुरेसे नसल्याने या समस्यात वाढ होताना दिसून येत आहे. शासनाने राज्यभरात किशोरवयीन मुलामुलींना समुपदेशन करण्यासाठी सुमारे १५० मैत्री क्लिनीक केंद्राची स्थापना केली आहे़ या केंद्रात मुलामुलींना मार्गदर्शन करण्यात येते़ तेथे त्यांच्याबद्दल नोंदविण्यात आलेल्या माहितीची गोपनियता ठेवण्यात येते़ आहार, विवाह, गरोदरपन, गर्भपात, प्रजनन संस्थेचे आजार, व्यसनमुक्ती याबाबत सल्ला आणि उपचाराकरिता परिचारिका, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि जज्ज्ञ उपलब्ध असतात़ यासह किशोरवयीन मुलींना आहाराविषयक योग्य माहिती देऊन रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न गरजेचे असल्याचेही यावेळी मान्यवरांनी सांगितले़(वार्ताहर)